शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हुक्का विक्रीवर कारवाई, लायन्स पॉइंटवर वन विभागाचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:54 IST

लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली.

लोणावळा : लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली. हुक्का जप्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनपाल विलास निकम यांनी दिली.वन परिमंडल लोणावळा व वन परीक्षेत्र वडगावच्या अंतर्गत येणाºया लायन्स व टायगर पॉइंटवर आज दिवसभर व रात्री वनपाल निकम, एम. व्ही. सपकाळे, वनरक्षक व्ही. जे. बाबर, वनरक्षक झिरपे, ए. ए. भालेकर, ए. ए. फडतरे, एस. बी. रामगुडे, जी. बी. गायकवाड यांच्या पथकाने वरील कारवाईकेली.लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लायन्स पॉइंटवर अतिरिक्त बंदोबस्तनेमत हुक्का विक्री करणाºयांवर कारवाई केली. संयुक्त वन व्यवस्थापन समितीनेदेखील स्थानिक विक्रेत्यांकडून अवैध धंदे होणार नाही याकरिता सूचना दिल्या आहेत.लायन्स पॉइंट हे ठिकाण मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांचे व नाइट लाइफचे ठिकाण झाले आहे. अनेक मुंबई व पुणेकर तरुण-तरुणी या ठिकाणी रात्र जागविण्याकरिता येत असल्याने परिसरातील हुल्लडबाजी सर्वश्रुत आहे.या ठिकाणी सुरू असलेला हुक्का व्यवसाय, तसेच अमली पदार्थांचे सेवन यामुळे मागील काळात या ठिकाणी खुनाचे दोन प्रकारघडले आहेत. नशेच्या नादाततरुणांनी या ठिकाणी दरीतजीवन संपविल्याच्या घटनाहीघडल्या आहेत.सातनंतर बंदी : निर्णयाची अंमलबजावणी नाहीघडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर लायन्स पॉइंट येथील अवैध धंदे रोखण्याकरिता हा पॉइंट सायंकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासन व वन विभागाने घेतला होता. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने रात्रभर या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. शनिवारी थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. रविवारी मात्र पोलीस प्रशासन व वन विभागाने या ठिकाणी मोठा बंदोबस्त नेमला असून, कडक कारवाई मोहीम सुरू केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळा