शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मिठाई घेताय, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 02:34 IST

दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारात तसेच परिचितांना भेटवस्तू म्हणून अनेक वेळा मिठाई दिली जाते. मात्र, मिठाईसाठी वापरला जाणारा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

पुणे : दिवाळीनिमित्त नातेवाईक व मित्रपरिवारात तसेच परिचितांना भेटवस्तू म्हणून अनेक वेळा मिठाई दिली जाते. मात्र, मिठाईसाठी वापरला जाणारा खवा भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत मिठाई घेताना सावधानता बाळगा, केवळ परवानाधारक विक्रेत्याकडूनच मिठाई खरेदी करा, अधिक भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) करण्यात आले आहे.दिवाळीत एकमेकांना गोडधोड देऊन आनंद द्विगुणित केला जातो. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील काही व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त खव्यापासून मिठाई तयार केली जात असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. प्रामुख्याने गुजरातमधून खव्यासारखा दिसणारा पदार्थ पुण्यातील मिठाई तयार करणाºया व्यावसायिकांकडून खरेदी केला जातो. त्यापासून मिठाई तयार केली जाते. मात्र, खव्यासारख्या दिसणाºया पदार्थाची वाहतूक खासगी बसमधून अनियंत्रित तापमानात केली जाते. त्यामुळे या पदार्थापासून तयार केलेले खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक ठरू शकतात.एफडीचे सहायक आयुक्त एस. पी. शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी गेल्या ३ महिन्यांत ३१ लाख ८२ हजार ४३२ रुपये किमत्तीचा खव्यासारखा दिसणारा पदार्थ जप्त केला आहे. प्रामुख्याने गुजरात राज्यातून अहमदाबाद, गांधीनगर, गोझाना, मेहसाना, तसेच जुनागड, राजकोट येथून खासगी ट्रॅव्हल्समधून हा गोड खवा येतो. एफडीने १७ हजार ५५२ किलो खव्यावर कारवाई केली आहे. परंतु, महिनाभरापासून हा खवा पुण्यात येण्याचे बंद झाले असल्याचा दावा मिठाई विक्रेत्यांनी केला आहे.भडक रंगाचे खाद्यपदार्थ शरीराला अपायकारक असतात. त्यामुळे ते खाद्यपदार्थ टाळावेत. तसेच, नागरिकांनी एफडीएच्या परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत.- सुरेश देशमुख, सहआयुक्त, एफडीए, पुणेगुजरात येथून पाठविल्या जाणाºया खव्याचा आम्ही निषेधच करतो. काही छोट्या मिठाई विकेत्यांकडून नफेखोरीसाठी या खव्याचा वापर केला जातो. पुण्यातील एकाही व्यापाºयांकडून गुजरातच्या खव्याची मागणी केली जात नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमानुसार केली जाणारी कारवाई योग्यच आहे.श्रीकृष्ण चितळे, अध्यक्ष, मिठाई विक्रेते असोसिएशनभेसळीतून नफा वाढविण्याचे गणितसाधारणपणे एक लिटर दुधापासून सुमारे २०० ग्रॅम खवा तयार होतो. त्यामुळे एक किलो खवा तयार करण्यासाठी पाच लिटर दूध लागते. त्यामुळे खव्यापासून तयार करण्यात आलेली मिठाई सुमारे ४८० रुपये किलोपर्यंत विकली जाते. परंतु, दूध पावडर, वनस्पती तेल आणि साखर टाकून तयार करण्यात आलेल्या खव्यासारखा दिसणारा पदार्थ मिठाई विक्रेत्यांकडून केवळ १८० रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतला जातो. त्यापासून मिठाई तयार करून विकली, तर मिठाई विक्रेत्यांना सुमारे ३०० रुपये नफा कमावता येतो.

टॅग्स :FDAएफडीएDiwaliदिवाळीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड