शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:47 IST

गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.

पिंपरी : पवना नदीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने रावेत बंधाऱ्यातील पाणी पातळीत घट होत आहे. या बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याने बंधाऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते.शहराला पवना नदीतून १०० टक्के पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे बंधारा बांधला आहे. या बंधाºयातून रोज ४७० एमएलडी पाणी उपसा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण शहराला पुरवठा केला जातो. सध्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अपुरा पुरवठा होत आहे.शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून योग्य दक्षता घेतली जात नाही. रावेत बंधाºयाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने कचरा टाकला जात आहे. तसेच, परिसरातील राडारोडा येथे टाकण्यात येतो. त्यामुळे बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी निर्माण झाली आहे. या दलदलीच्या व दुर्गंधीयुक्त पाण्याचा उपसा शुद्धीकरण केंद्राकडे होत आहे. त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.रावेत बंधारा येथे सुरक्षाव्यवस्था नसल्याने कोणीही सहजपणे या ठिकाणी कचरा वा राडारोडा टाकून जाते. या ठिकाणाहून पिंपरी महापालिका, जलसंपदा विभाग व एमआयडीसी यांच्याकडून उपसा केला जातो. मात्र, तिन्ही विभागांत समन्वय नसल्याने अनेक वर्षांपासून येथे गाळ साचून दलदल निर्माण झाली आहे. येथील गाळ काढण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते संजय फडके व विजय भोंडवे यांनी दिली.

टॅग्स :ravetरावेत