शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निलंबित करा; माजी महापौरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 20:18 IST

माझ्यावर झालेले आरोप चुकीचे : अजित पवार 

पिंपरी : कोरोना कोळात कोविड सेंटरसाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून बिल मंजूर केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी महापाैर योगेश बहल यांनी केली. पवार महापालिकेत बेकायदेशीर कार्यरत असून त्यांनी कार्यालय खाली करावे, अशीही मागणी त्यांनी केली. 

पिंपरी येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषद झाली. त्यावेळी बहल यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यावर आरोप केले. बहल म्हणाले, पवार यांना एक कोटी रुपयांपर्यंत खर्चाला मान्यता देण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांनी कोविड सेंटरसाठी जास्तीच्या खर्चाला मान्यता दिली तसेच रक्कमही अदा केली. यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. अजित पवार यांची ५ सप्टेंबर २०१९ रोजी जातपडताळणी समिती पुणेच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली. मात्र त्यांनी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार न सोडता शासन आदेशाचा भंग केला. बेकायदेशीरपणे ते अतिरिक्त आयुक्तपदावर ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी घेतलेल्या तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांची चौकशी करून ते निर्णय रद्द करावेत. त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय हे बेकायदेशीर असल्याने त्यांच्याकडून ते तत्काळ वसूल करावेत.   

श्रावण हर्डीकर चांगले अधिकारी पण...महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर चांगले अधिकारी आहेत. मात्र त्यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना मोकाट सोडून दिले. त्यामुळे गैरप्रकार घडून भ्रष्टाचार झाला. महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी योगेश बहल यांनी केली आहे. 

माझ्यावर झालेले आरोप चुकीचे : अजित पवार कोविड सेंटरच्या खर्चासाठी महापालिका आयुक्तांनी सहा कोटी ५१ लाखांवर मान्यता दिली आहे. त्यात तीन कोटी २९ लाख रुपयांचे बिल स्पर्श हाॅस्पिटल तर उर्वरित रक्कमेचे बिल इतर कोविड सेंटरची आहेत. आयुक्तांच्या मान्यतेनंतर बिले काढण्याचे सर्व अधिकार अतिरिक्त आयुक्तांना आहेत. आयुक्तांनी मंजूर केल्यानंतर बिल पुन्हा आयुक्तांकडे सहीसाठी जात नाही. सर्व बिले अतिरिक्त आयुक्तांच्या सहीने प्रोसीड केली जातात. हा महापालिकेचा नियम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कानील कायद्यानुसार त्याबाबत राज्य शासनाने महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेले आरोप चुकीचे आहेत, असे अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड