शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

कोरोनाला हरविण्यासाठी पिंपरीत १० दिवसांत २४ लाख नागरिकांचे सर्वेक्षण होणार: महापौर उषा ढोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:18 IST

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार

ठळक मुद्देकोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे

पिंपरी : कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. नियोजन आढावा बैठक स्थायी समिती सभागृहामध्ये झाली. यावेळी  आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य विलास मडीगेरी,अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे.’’आमदार जगताप म्हणाले, ‘‘मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान २५ घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी. काम करणाऱ्या स्वयंसेवकांना मानधन द्यावे.’’आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा. ५० वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये तसेच काम करणाऱ्या स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे. प्रत्येक पथकामध्ये एक महिला, एक पुरुष स्वयंसेवक व मनपा कर्मचारी असावा.’’आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘१२ स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व १२ स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवकांना किमान १० वी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे.’’

दोन टप्प्यात मोहीममोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दि. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि दुसरा टप्पा १४  ते २४ ऑक्टोबर असणार आहे.  प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान तपासणे, ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांच्या मदतीने मोहीम होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकरcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौर