शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पवनामाईच्या स्वच्छतेसाठीच रविवार, संघटनांचा पुढाकार, रावेतपासून दापोडीपर्यंत मोहीम, जलपर्णीचे करणार समूळ उच्चाटन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:42 IST

रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली.

रावेत : रोटरी क्लब वाल्हेकरवाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन ‘माझी पवनामाई स्वच्छ सुंदर पवनामाई’ हा उपक्रम हाती घेऊन त्याची सुरुवात रावेत येथील नदीपात्रापासून केली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, जलमैत्री अभियान, भावसार व्हिजन इंडिया, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, मोरेश्वर भोंडवे तरुण मित्र मंडळ या संस्थांच्या माध्यमातून वाल्हेकरवाडी येथील पवना नदीवर स्वच्छ सुंदर पवना नदी ही मोहीम रावेत ते दापोडी या २४ किलोमीटर पट्ट्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यातयेणार आहे.याच मोहिमेंतर्गत ही जलपर्णी काढण्यात आली. पवना नदी संवर्धनासाठी उपाययोजना या मोहिमेचा शुभारंभ पवना नदीपात्रात करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात वाल्हेकरवाडीमधील सर्व नाल्यांची सफाई आणि त्यावर प्रक्रिया हा टप्पा पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जाधव घाटावर असणारी सर्व जलपर्णी पूर्णपणे काढण्यात आली़ वाल्हेकरवाडी पवना घाटावर जाऊन जलशुद्धीकरण आणि जलपर्णी यावर काय उपाययोजना करता येतील याची चर्चा नागरिकांसमवेत करण्यात आली होती.नगरसेवक सचिन चिंचवडे, वाल्हेकरवाडी प्रभागाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य मोरेश्वर भोंडवे, पर्यावरण विभागप्रमुख संजय कुलकर्णी, वाल्हेकरवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर चिंचवडे, मारुती उत्तेकर, सोमनाथ हरपुडे, सचिन काळभोर, जगन्नाथ फडतरे सहभागी झाले. या वेळी जलदिंडीचे राजीव भावसार, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संदीप पवार, इंद्रायणी नदी स्वछता अभियानचे देहू येथे सोप्या पद्धतीने जलपर्णी काढणारे सोमनाथ मुसुडगे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी मार्गदर्शन केले.या वेळी भावसार व्हिजनचे राजीव भावसार, रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, नदी संवर्धन मोहिमेत गेली अनेक वर्षे काम करणारे सोमनाथ मसुडगे, सुभाष वाल्हेकर, सोमनाथ हरपुडे, युवराज वाल्हेकर, चिंतामणी सोंडकर, सचिन काळभोर, सचिन शिवले उपस्थित होते.प्रत्येक रविवारहा नदी संवर्धनासाठी४दर रविवार हा नदी संवर्धनासाठी देणार असल्याचे नागरिकांनी या वेळी सांगितले. नदीपात्रातून २ ट्रक इतकी जलपर्णी काढण्यात आली. जलपर्णी जमा होण्यासाठी वालरोप बांधण्यात आले होते. त्यावरील साचलेली जलपर्णी काढण्यात आली. हा वालरोप गरवारे वालरोप कंपनीकडून पुरविण्यात आला होता. लोकसहभागातून नदी संवर्धन उपक्रम नागरिकांनी हाती घेतला असताना पालिकेच्या ना पर्यावरण विभागाचे, ना आरोग्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले़ या बाबत नागरिकांनी पर्यावरण विभागप्रमुखांकडे खंत व्यक्त केली.पवना नदीमध्ये सातत्याने जलपर्णीचा भेडसावणारा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न होत असताना पालिका प्रशासनाने येथे आवश्यक त्याबाबी पुरविणे गरजेचे आहे. याकडे मात्र डोळेझाक केलेली आहे़ या माध्यमातून पालिकेचे जलपर्णी काढण्यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचत असताना येथे बोट उपलब्ध करून दिली असती तर अधिक जोमाने कामाला गती मिळाली असती़ पुढील टप्प्यातील कामाच्या वेळी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तर शहराला येथून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाईल.- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवकपवनामाईच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या उपक्रमात सातत्य ठेवून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास पालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल. या उपक्रमामुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसराला भेडसावणारी आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. - सचिन चिंचवडे,ब प्रभाग अध्यक्ष‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या उपक्रमांतर्गत रावेत ते दापोडी हा २४ किलोमीटरचे नदी पात्र टप्प्याटप्प्याने दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आह़े सध्या जलपर्णी वाढण्यासाठी पोषक वातावरण असते़ याच काळात वाढणारी जलपर्णी रोखली तर पुढे जलपर्णी वाढणार नाही व नदी सतत स्वच्छ राहण्यास मदत होईल.- प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष रोटरी क्लब, वाल्हेकरवाडीरावेत ते दापोडी २४ किमी पट्ट्यात मोहीमजलपर्णी बांधण्यासाठी वॉलरोपचा वापरनागरिकांसमवेत चर्चाकरुन उपाययोजना

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड