शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

उपसूचनांवर एकमत नसल्याने सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:22 IST

पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील विशेष सर्वसाधारण सभा दुसºयांदा तहकूब केली आहे. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचे कारण देण्यात आले. मात्र, अर्थसंकल्पावरील काही उपसूचनांवर एकमत न झाल्याने सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर ...

पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील विशेष सर्वसाधारण सभा दुसºयांदा तहकूब केली आहे. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचे कारण देण्यात आले. मात्र, अर्थसंकल्पावरील काही उपसूचनांवर एकमत न झाल्याने सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, अवघ्या दोन तासांतच अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा सभापती सीमा सावळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला आहे.भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होऊ न देता अवघ्या दहा मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केला होता. ही परंपरा कायम ठेवणार, की सदस्यांना त्यावर बोलू देणार, याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा होती. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आज अर्थसंकल्पावरील सभा दुसºयांदा तहकूब केली.सुरुवातीलाच सुजाता पालांडे यांनी महापौरांना सभागृहाच्या वतीने शुभेच्छा देण्याची सूचना मांडली. त्यानंतर नामदेव ढाके यांनी माजी नगरसेविका डॉ. कमरुनिस्सा खान, अभिनेत्री शम्मी रबाडी, शिक्षक विनायक राऊत यांच्यासह विविध क्षेत्रांतील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली.सभा शास्त्राचे संकेत धुळीसविशेष महासभेत सभाशास्त्राचे संकेत पायदळी तुडविले. एकाच सभेत अगोदर महापौरांना पदाधिकाºयांनी आणि गटनेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर, त्यानंतर दिवंगत माजी नगरसेविकेला श्रद्धांजली वाहिली. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहिल्याने सभाशास्त्राचे संकेत धुळीस मिळविल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड