शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी औद्योगिक वसाहतींना नव्याने उभारी देणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:21 IST

सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

ठळक मुद्देराज्यभरातील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्याकरिता लोणावळ्यात बैठकमागील २० वर्षांपासून सहकारी संस्थांच्या समोर अनेक समस्या : देशमुख

लोणावळा : सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन व लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत लोणावळा यांच्या वतीने राज्यभरातील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या समस्या जाणून घेण्याकरिता लोणावळ्यात आयोजित बैठकीला सहकारमंत्री देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, उद्योग सहसंचालक राधाळकर, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मावळचे सभापती गुलाबराब म्हाळसकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बाबा शेट्टी, जयश्री आहेर, देविदास कडू, लोणावळा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष देवराम लोखंडे, प्रकाश कोटनिस, सहकारी संस्थांचे निबंधक मिलिंद अत्रे, पुणे विभागाचे निबंधक राजाळे, जिल्हा उपनिबंधक कटके आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, की मागील २० वर्षांपासून सहकार विभाग व शासन यांच्या दुर्लक्षित धोरण व पाठपुराव्या अभावी सहकारी संस्थांच्या समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यापुढील काळात मात्र या संस्थांना महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्याकरिता कसोशिने प्रयत्न करणार आहे. त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांना लागणारा कच्चा माल, कुशल कामगार, अल्पदरात विज अथवा सौरऊर्जा, उत्पादित मालाकरिता बाजारपेठ या गोष्टी उपलब्ध करुन देण्यावर सहकार विभागाचा भर असेल असे सांगितले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखlonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड