शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

मोकाट जनावरांचा निगडीकरांना त्रास

By admin | Updated: January 12, 2017 02:38 IST

रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी

निगडी : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी रस्त्यावर ठिय्या मांडून बसणारी मोकाट जनावरे निगडीकरांची नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास मात्र दुर्लक्ष होत आहे.निगडीतील जुना पुणे-मुंबई रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही जनावर दिसले की, काढता पाय घेतात. रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाही. भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक व यमुनानगर या भागात वाहनांची व नागरिकांची दररोज गर्दी असते. त्या ठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले, तर ही जनावरे भाजीपाल्यावर ताव मारतात. ग्राहकांच्या हातातील पिशव्यातही तोंड घालायला जनावरे मागेपुढे पाहत नाहीत. ऐन गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जिवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. निगडी परिसरात बहुतांश जनावरे रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच धांदल उडते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. (वार्ताहर)