शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

संत तुकाराममहाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:07 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहोत्सवात राज्यातील विविध कीर्तनकारांची ऐकायला मिळणार कीर्तने श्री संत तुकाराममहाराज चरित्र निरूपण करणार माऊलीमहाराज सावर्डेकर

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.  या प्रसंगी संस्थानचे विश्वस्थ अशोक निवृत्ती मोरे, उमेश मोरे आदी उपस्थित होते. श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) ते माघ शुद्ध दशमी (अनुग्रह दिन) या कालावधीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेसह कीर्तन महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील विविध कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत.श्री संत तुकाराममहाराज चरित्र निरूपण माऊलीमहाराज सावर्डेकर करणार आहेत. व्यासपीठ बाळासाहेबमहाराज भोंदोंकर सांभाळणार आहेत. या कालावधीत पहाटे ४ ते ६ काकडा, पहाटे ५ ते ६ महापूजा, ७ ते १२ गाथा पारायण, दुपारी १२  ते २ संगीत भजन, दुपारी २ ते ४ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ श्री संत तुकाराममहाराज चरित्र निरूपण, सायंकाळी६ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन व रात्री १० नंतर जागर होणार आहे.याच कालावधीत जिजामाता महिला भजनी मंडळ, देहू, गोरक्षनाथ भजनी मंडळ, देहू, भैरवनाथ भजनी मंडळ, चºहोली, फिरंगजाई भजनी मंडळ दापोडी, स्वामी समर्थ भजनी मंडळ, निगडी, श्री कृष्ण भजनी मंडळ, माळीवाडी यांची भजन सेवा होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मोरे यांनी दिली.कीर्तन महोत्सवात रोज रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होणार आहेत. सोमवार दि. २२ जानेवारी रोजी रामरावमहाराज ढोक, मंगळवार दि. २३ रोजी महादेवमहाराज बोराडे शास्त्री, बुधवार दि. २४ रोजी दादामहाराज शिरवळकर, गुरुवार दि. २५ रोजी महादेवमहाराज राऊत, शुक्रवार दि. २६ रोजी शंकरमहाराज शेवाळे, शनिवार दि. २७ रोजी उद्धव मंडलिकमहाराज, रविवार दि. २८ रोजी अनिलमहाराज पाटील बार्शीकर तर सोमवार दि. २९ रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत देहूकरमहाराजांचे काल्याचे कीर्तन होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मोरे यांनी दिली.

टॅग्स :sant tukaramसंत तुकारामdehuदेहूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड