शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णी काढण्यास सुरुवात, महापालिकेसह सरसावल्या सामाजिक संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:52 IST

सांगवी, पिंपळे गुरव भागातील परिसराला लागून असलेल्या पवना नदीतील जलपर्णी वाढीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डास व इतर किटकांमुुळे परिसरात आजार वाढत असल्याचे दिसून आले होते.

सांगवी : सांगवी, पिंपळे गुरव भागातील परिसराला लागून असलेल्या पवना नदीतील जलपर्णी वाढीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डास व इतर किटकांमुुळे परिसरात आजार वाढत असल्याचे दिसून आले होते. त्या संदर्भात प्रभाग क्रमांक ३२ मधील माई ढोरे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे व शारदा सोनवणे या चारही नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि. १६) सविस्तर वृत्त प्रसिद्धकेले. त्याची दखल घेत पवना नदीपात्रातून येथे जलपर्णी काढण्यात येत आहे.देहू येथील रानजाई प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ मसुडगे, भाऊसाहेब विजन, राजू सावळे यांच्यासह सावरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब, पोलीस मित्र संघटना आदी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला.जलपर्णी काढून मोशी येथील कचरा डेपोत पाठवण्यासाठी महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाचेआरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी जलपर्णी काढण्यासाठी पवना नदी घाटावर आले होते. अहिल्याबाई होळकर घाट व जुनी सांगवीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ साचलेली जलपर्णी काढण्यात आली.सहायक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, वैद्यकीय अधिकारी राजेश भाट, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या सूचनेनुसार मुकादम अंकुश गवारे व कर्मचारांच्या मदतीने ही जलपर्णी काढण्यात आली. जलपर्णी काढण्याचे काम आणखीकाही दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासन या बाबतीत पूर्ण लक्ष देत आहे. लवकरच नदीपात्रातील जलपर्णी पूर्ण काढण्यात येईल.- ज्ञानेश्वर सासवडकर, सहायक आरोग्य अधिकारी, ह प्रभागप्रभागाच्या चारही नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महापालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या. आरोग्य अधिकाºयांसह पाहणी करून कर्मच्याºयांना जलपर्णी काढण्याच्या सूचना दिल्या. जलपर्णी साठणार नाही यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जुनी सांगवीतील प्रियदर्शनीनगर जयराज रेसिडेन्सी व नवी सांगवी येथील साई सोसायटी आदी परिसरात औष्णिक धुरीकरण फवारणी करण्यात येत आहे.- हर्षल ढोरे, नगरसेवक