पिंपरी : शहरातील परिवहन कार्यालय (आरटीओ) येत्या शनिवार व रविवार (दि. १४ व १५) या दोन्ही दिवशी सुरू राहणार आहे. त्यामुळे नवीन वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने असणारे कर भरणाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीनिमित्त विविध शासकीय कार्यालयांना ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सुट्या आहेत. आरटीओ कार्यालयालाही सुटी आहे. परंतु, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. या साऱ्या वाहनांची नोंदणी, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या करांचा भरणा करून घेणे ही कामे करायची असतात. त्यामुळे सुटीच्या दिवशी म्हणजेच १४ व १५ नोव्हेंबरला आरटीओ कार्यालय सुरूच राहणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ सुटीच्या दिवशीही सुरू
By admin | Updated: November 12, 2015 02:25 IST