शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

स्थायी समिती : पाच सदस्यांना मिळणार संधी, भाजपात इच्छुक नगरसेवकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:28 IST

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत.

पिंपरी  - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे नवीन ५ सदस्यांची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे़ २० मार्चच्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. समितीत वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी पक्षात चुरस लागली आहे.महापालिका स्थायी समितीत १६ सदस्य असून, त्यात भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एकाचा समावेश आहे. पहिल्या वर्षानंतर त्यातील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त होतात. यावर्षी सत्ताधाºयांनी स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून अकराही सदस्यांचे राजीनामे भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतले होते. व पाच वर्षांत ५५ सदस्यांना संधी देणार असे जाहीर केले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपाचे सहा सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यानंतर, या सदस्यांच्या जागेवर नव्याने नियुक्ती केली. लकी ड्रॉमध्ये भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच अपक्ष कैलास बारणे हे बचावले होते.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपाने चिठ्ठीतून बचाविलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. निवडणूक प्रक्रिया निर्धोक पार पडल्यावर भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी राजीनामे मंजूर करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, महापौर नितीन काळजे यांनी राजीनामे मंजूर केल्याचे लेखी पत्र नगरसचिव विभागाला दिले....नेत्यांचे उंबरे झिजविताहेतरिक्त झालेल्या पाच जागांवर संधी मिळावी, म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी नेत्यांकडे साकडे घातले आहे. याच समितीत संधी मिळावी, म्हणून नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवित आहेत. या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. चुरस निर्माण झाली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड