शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

दुचाकीस्वाराने दगड मारल्याने एसटी चालक गंभीर जखमी; देहूरोड पोलीस ठाण्याजवळील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 19:43 IST

एस. टी. बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ घडली.

ठळक मुद्देचालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमीसरकारी कामात अडथळा आणून बसचे नुकसान करून दुचाकीस्वार पसार

देहूरोड : मुंबईकडून पुण्याकडे जात असलेल्या एका  दुचाकीवरील  मागे बसलेल्या  इसमाने पंढरपूरहून तळेगाव दाभाडे येथे चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) बसच्या चालकाच्या बाजूच्या काचेच्या दिशेने मारलेला दगड बसच्या चालकाच्या कपाळावर लागून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सेंट ज्यूड हायस्कूलजवळ घडली असून संबंधित चालकावर कासारवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दगड मारून संबंधित दुचाकीस्वार पळून गेले आहेत.राहुल मधुकर मोरे (वय ३६, रा चिंचोली, पो. देहूरोड, ता. हवेली) असे गंभीर जखमी झालेल्या बसच्या चालकाचे नाव असून याबाबत बसचा वाहक श्रीकांत गायकवाड (वय २८, रा. तळेगाव दाभाडे, मूळ गाव तळणी, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरहून तळेगाव दाभाडे येथे चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस एमएच १४  बीटी २८२१) रविवारी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी देहूरोड येथील सेंट ज्यूड हायस्कूलजवळ आली असताना मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने चालकाच्या बाजूच्या काचेवर दगड फेकून मारल्याने दगड चालकाच्या कपाळावर लागल्याने चालक गंभीर जखमी झाला असून सरकारी कामात अडथळा आणून बसचे नुकसान करून दुचाकीस्वार पळून गेले असून त्यांच्यावर कलम ३५३, ३३२, ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :dehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड