शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण प्रवेशद्वार वाहतूक समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:14 IST

पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो

हिंजवडी : पिंपरी-चिंचवड शहराचे दक्षिण दिशेला असलेला हिंजवडी-वाकड परिसर आयटीपार्कच्या वर्दळीमुळे कायमच वाहतुकीच्या समस्येने ग्रासलेला असतो. येथील वाढते शहरीकरण, शैक्षणिक संस्था, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ आणि त्या तुलनेत तोकडी व्यवस्था यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना जोडणा-या मार्गावर वेळीच उपाययोजना न केल्यास वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होणार आहे.हिंजवडी परिसरात आयटीपार्कमुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या आयटीपार्कमध्ये तीन लाख कर्मचारी काम करत आहेत. यासाठी खासगी व सार्वजनिक अशा जवळपास तीन हजार बसेस वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. परिसरातील रस्त्यावर रोज किमान एक लाखांपेक्षा अधिक चारचाकी वाहने धावतात. लाखोंच्या संख्येत दुचाकीस्वार आहेत. पुढील दोन वर्षांत दीड लाख कर्मचाऱ्यांची भर आयटीपार्कमध्ये पडणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी अधिक सक्षम पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. आयटी पार्कसाठी सहा रस्ते दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले आहेत. त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु सध्या केवळ दोन रस्ते खुले आहेत. दोन्ही रस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जातात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात येणाºया रस्त्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.सांगवी, पिंपळे-निलख, वाकड, थेरगाव परिसरातही वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यातही नियोजनबद्ध वाहतूक असल्यास काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागतो. वाहतूक विभागाने सुरू केलेली बस लेनमुळे बस वेळेत पोहोचतात. अलीकडे या बस लेनहून दुचाकीस्वार जाताना दिसतात. यामुळे परिस्थिती अधिक कठीण होते. आयटी कंपन्यांच्या एचआयए संस्थेतील कंपन्यांनी कामाच्या वेळेत बदल केल्याने काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होताना दिसत आहे.