शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात घातली सिलिंडरची टाकी, माळवाडीमध्ये मुलाने केला आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 06:47 IST

ही धक्कादायक घटना तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील येथून जवळच असलेल्या माळवडी (ता.मावळ) येथे...

तळेगाव दाभाडे : विक्षिप्त मुलाने क्षुल्लक कारणावरून आईच्या डोक्यात लोखंडी गॅस सिलिंडरची टाकी घालून तिचा खून केला. ही धक्कादायक घटना तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील येथून जवळच असलेल्या माळवडी (ता.मावळ) येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.मीना बाळासाहेब दाभाडे (वय ५५, शितळादेवी मंदिर शेजारी ,माळवाडी ता.मावळ, जि. पुणे)असे दुर्दैवी जन्मदात्रीचे नाव आहे. राम बाळासाहेब दाभाडे (वय २७) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या संदर्भात मयत मीना यांचे दीर शांताराम सीताराम दाभाडे (वय ६५, माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील,पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले,विक्रम पासलकर यांनी भेट दिली. माडगूळकर यांनी तपास कामी महत्त्वाच्या सूचना दिल्या.आरोपी राम दाभाडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या या घटनेमुळे आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लागला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम दाभाडे हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर येरवडा येथे उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. किरकोळ भांडणाचा राग मनात धरल्याने मुलाकडून हे दुष्कृत्य घडले.घरात आई मीना आणि मुलगा राम असे दोघेच होते.तो विक्षिप्त असल्याने घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन त्याने आई मीना हिच्या डोक्यात लोखंडी गॅस सिलिंडरची टाकी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मीना यांना पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अमानुष घटनेमुळे माळवाडी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखून