शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम कोसळून मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:08 IST

संत तुकारामनगर येथे भर पावसात घाईघाईत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कोसळले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

पिंपरी : संत तुकारामनगर येथे भर पावसात घाईघाईत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम कोसळले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रस्त्याने जाणाºया चौदा वर्षाच्या मुलाच्या अंगावर भिंत पडल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. अवैध बांधकामे नियमितीकरण, शास्ती माफीचे मुद्दे चर्चेत असताना, नागरिकांना वाढीव बांधकामे करण्याचा मोह आवरेनासा झाला असल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले आहे.संत तुकारामनगर येथे म्हाडाने उभारलेल्या गृहप्रकल्पातील गाळेधारकांनी छोट्या जागेत मोठे इमारतीचे इमले उभारले आहेत. या भागात सर्वत्र अशी बांधकामे दिसून येतात. अमरज्योत मित्र मंडळ चौकाजवळ अन्वर शेख यांच्या घराचे गुरुवारी वाढीव बांधकाम सुरू होते. दुसºया मजल्यावर वीट बांधकाम केले जात होते. त्या वेळी जवळच राहाणाºया गोणते कुटुंबातील निनाद हा चौदा वर्षांचा मुलगा बिस्किट घेण्यासाठी दुकानात जात होता, त्याचवेळी १५ फूट उंचीवरून सिमेंट, वाळू व विटा खाली पडल्या. बांधकाम सुरू असलेली भिंत निनादच्या अंगावर कोसळली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. निनादचे आईवडील मावळात गेले होते. घरी निनादला सांभाळण्यासाठी त्याची आजी थांबली होती. निनाद जखमी झाल्याने आजीची धावपळ उडाली. रस्त्यावरील चार दुचाकी विटांच्या ढिगाºयाखाली अडकल्या.२० हजार द्या अन् अनधिकृत बांधकाम करा!एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. दंड आकारून अशी बांधकामे नियमित केली जातील, असे धोरणशासनाने जाहीर केल्यानंतरही अनधिकृत बांधकामे नियंत्रणात मात्र येत नाहीत.नागरिकांनी जोखीम पत्करून अशी बांधकामे सुरूच ठेवली आहेत. अधिकाºयांना २० हजार द्या अन् बिनधास्त बांधकाम करा, अशी या भागात स्थिती असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.घरमालकावर गुन्हासुरक्षेची काळजी न घेतल्याप्रकरणी घरमालक अन्वर उस्मान शेख (रा. संत तुकारामनगर) यांच्याविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. हेमंत खंडू गोणते (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.