शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डीआरडीओ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:38 IST

कायदेशीर बाबी तपासून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले.

तळेगाव दाभाडे - येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटन (डीआरडीओ) प्रकल्पाच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळावा, तसेच यातील जाचक अटी रद्द होऊन पुनर्वसन सानुग्रह अनुदान तातडीने वाटप व्हावे हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी आमदार संजय भेगडे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. कायदेशीर बाबी तपासून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले.मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने प्रकल्पग्रस्त शेतकरी आश्वस्त झाले आहेत. शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार संजय भेगडे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, जगन्नाथ भेगडे पाटील, अशोक शेलार, भीमाजी शेळके, उद्धव शेलार, सुनील वाळुंज, अशोक भेगडे, बाळतात्या भेगडे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.संरक्षण विभाग वाढीव मोबदला देण्याचा प्रश्न मार्गी लावत नसल्याने वाढीव मोबदल्यासंदर्भातील न्यायालयाचा निर्णय सर्व शेतकरी यांना मान्य राहील. त्यामुळे संरक्षण विभागाकडे हा विषय शेतकºयांच्या दृष्टीने संपला आहे, असे कृष्णराव भेगडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. संरक्षण विभागाने ‘पुनर्वसन पॅकेज डील’अंतर्गत एकरी २.५० लाख रुपये रक्कम प्रदीर्घ काळापासून पुणे ट्रेझरीकडे जमा आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या कक्षेत ही बाब मोडते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा. या रकमेचे बिनशर्त व्याज रकमेसह वाटप करण्याचा शासनाने निर्णय घ्यावा. देशाच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या प्रकल्पासाठी सन २००४ मध्ये सुमारे ४७५ एकर जमीन शासनाच्या ताब्यात देणाºया शेतकºयांना कधी न्याय मिळणार, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. न्याय मिळण्यासाठी आंदोलन एवढाच पर्याय असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड