शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:21 IST

पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत.

पिंपरी  - पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षित महिलांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर या सोशल मीडियावर ८ मार्चला विविध उपक्रम व चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. महिलांच्या अभिव्यक्तीचे सोशल मीडिया व्यासपीठ ठरू लागला आहे.पारंपरिक रितीरिवाजाची अनेक बंधने तिच्यावर होती. त्यामुळे तिला अबला समजले जात होते. तिचे सबलीकरण व सक्षमीकरणासाठी आरक्षणासह अनेक महत्त्वाचे निर्णय काळाबरोबर घेण्यात आले. ‘ती’ घरातून बाहेर पडून शिक्षण घेऊ लागली. पूर्वी अन्याय व अत्याचाराला एकटीला सामोरे जावे लागत होते. आता महिला संघटित झाल्या आहेत.आपले प्रश्न व समस्या मांडण्यासाठी उच्च शिक्षित महिलांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून #मुलगी वाचवा, #मुलगी शिकवा, #सावित्रीच्या लेकी, #कोपर्डी, #निर्भया, #सॅनिटरी-नॅपकिन असे विविध हॅशटॅग वापरून त्याविषयी चर्चा व जनजागृती घडविण्यात त्या पुढाकार घेत आहेत. वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती सर्वदूर पोहोचत आहेत. त्या आता व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर आपल्या समस्या व अनुभव शेअर करताना संकोचत नसल्याचे दिसून येत आहे.#महिलादिनाचे हॅशटॅगजागतिक महिला दिनानिमित्त सोशल माध्यमांवर वावरणाºया स्त्रियांना बिनधास्त व्यक्त होण्यासाठी #महिलादिन हा हॅशटॅगचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. टिष्ट्वटरवरील मराठी ब्रेन (मराठी विश्वपैलू पेज) यांच्यासह अनेक टिष्ट्वटरवर महिलांच्या मदतीने हा उपक्रम सुरू असून उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमासाठी मराठी रीटिष्ट्वट, हॅशटॅग मराठी यांच्यासह अनेक पेजचे सहकार्य मिळाले आहे.मराठी टिष्ट्वटरकट्टाचा अनोखा उपक्रमटिष्ट्वटरवर मराठीब्रेन आणि मराठीविचार यांच्यावतीने मराठी टिष्ट्वटरकट्टा हा संयुक्त उपक्रम चालविला जातो. यामध्ये सामान्य ते विविध क्षेत्रांतील नामवंत महिला यांच्यासोबत टिष्ट्वटच्या माध्यमातून प्रश्न-उत्तर पद्धतीने संवाद साधला जातो. याआधीही अनेक क्षेत्रांतील महिला या टिष्ट्वटरकट्टयावर सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी (दि. ८) सकाळी ११वा. मराठी-हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाºया मराठमोळ्या अभिनेत्रीशी संवादाचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड