शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह, महापालिकेचा पुढाकार, कासारवाडीत उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:09 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव होता. शहरात अपवादात्मक स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह दिसून येत होती.

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव होता. शहरात अपवादात्मक स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह दिसून येत होती. शहराचा सर्वांगिण विकास साधत असताना, महिलांच्या स्वच्छतागृह सुविधेचा विसर पडला होता. मात्र, शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्याने महापालिका प्रशासनाने महिला स्वच्छतागृहांचा विषय गांभीर्याने घेतला असून, शहरात स्मार्ट स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.शहराची लोकसंख्या २० लाखांच्यावर गेली आहे. ठिकठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने त्यांची कुचंबना होते. स्वच्छता अभियान राबविताना, स्वच्छतेच्या उपाययोजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात सार्वजनिक मुताºयांचाही अभाव दिसून येत आहे. पिंपरी कॅम्प आणि परिसरातील सार्वजनिक मुता-यांच्या जागेवर अतिक्रमणे झाली. महिलांसाठी तर स्वच्छतागृह सुविधाच उपलब्ध करून दिली नव्हती. विलंबाने का होईना महापालिकेला महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचे सुचले. याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.