शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उभारणार रेशीम प्रशिक्षण केंद्र - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:54 IST

राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

पुणे : राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. रेशीम उत्पादकांना कर्नाटकात जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत असून भाषेच्या अडचणीमुळे त्याला लाभ मिळत नसल्याचेही ते म्हणाले.रेशीम संचालनालयाच्या वतीने महारेशीम अभियान व राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा, पुरस्कार वितरण समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्सव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.जगाच्या तुलनेत रेशीम उत्पादन आपल्या देशात चिंताजनक आहे. चीनमध्ये रेशीमचे उत्पादन १३ टक्के असून आपल्याकडील हे प्रमाण अत्यंत तुरळक आहे. यामधून तळागाळात उद्योग निर्माण होऊ शकतील. या व्यवसायात अडचणी आहेत, विक्री करताना कर्नाटकात फसवणुकीचे प्रकार घडतात. समतादूतांनी यावर काम करावे. समूह केल्याशिवाय मनरेगाची योजना राबविता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांचे गट करून मनरेगाची योजना राबवण्यासोबतच मनरेगाला निधीची कमतरता भासून न देता समतादूताच्या माध्यमातून मनरेगाची योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे ते म्हणाले. पैठणीचे ब्रँडिंग करून माल विकण्यासोबतच ग्रामीण भागातील हातमाग उत्पादकांनी मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शने भरवावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना उत्पादन खर्चात पन्नास टक्के नफा देण्याचा केलेला संकल्प रेशीम उत्पादनातून शक्य आहे. त्यामुळे राज्यातील रेशीम उत्पादनाचा टक्का वाढविण्यासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्रासह परदेश दौरे काढण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.खोतकर म्हणाले, की राज्यात हातमाग व रेशीम उद्योगाची स्थिती बदलून त्याला गती देण्याची आवश्यकता आहे.कृती आराखड्याचे नियोजन आवश्यकपरदेशातील नवनवीनसंकल्पनांचा आपल्या शेतकºयांना लाभ होऊन उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. समतादूताच्या सहकार्याने मनरेगाच्या माध्यमातून केवळ पंचवीस दिवसात पाच हजार एकरांवर तुतीचे क्षेत्र वाढविण्यात आले असून आगामी दोनशे दिवसांच्या कृती आराखड्याचे नियोजन करावे, असेही देशमुख म्हणाले.पुणे आणि औरंगाबादमध्ये रेशीम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. एक संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी अभ्यासू असून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उत्पादकांना प्रशिक्षण अथवा माहिती घेण्यासाठी परदेशात जायचे असल्यास त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारSubhash Deshmukhसुभाष देशमुख