चिंचवड : मराठी भाषा दिनानिमित्त परिसरात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. स्वाक्षरी अभियान, मिठाई, गुलाबपुष्प वाटप अशा विविध कार्यक्रमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मोहनगरातील मैत्रेय प्रतिष्ठान व श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. परिसरात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. नगरसेविका सुजाता टेकवडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, गणेश लंगोटे, संजय जगताप, जयश्री निंबाळकर, गणेश जाधव, राहुल कुडटकर, महेंद्र महाराणा, सोमनाथ अलंकार, मनीष नामदे आदींनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.दळवीनगर, उद्योगनगर येथील समता मित्र मंडळ, रॉयल स्पोर्ट्स क्लब व आठवण ग्रुपच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन केले. दत्तात्रय खांबे, पंडित खुरंगळे, अण्णा दळवी, अशोक वाळुंज, बापू भालेकर, प्रकाश लोखंडे, आदित्य जाधव,सागर जंजाळे, विजय पुजारी, खंडुदेव कठारे, विकास मुंजेवार, जगदीश पोकम्पल्ली यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.भोईरनगर येथे शरद भुजबळ, आसिफ शेख, सचिन चव्हाण, सूरज लखन, विजेंद्र भोईर, श्याम सरपट्टा, पुनीत कांबळे, शिवदास सातपुते, निखिल सिंग यांनी शुभेच्छा दिल्या.गौरव फलकाचे अनावरण नेहरूनगर : वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड आगारामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरवफलकाचे अनावरण डॉ. बाबासाहेब शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.महात्मा फुले विद्यालयाचे प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे, प्रियदर्शनी वाघ, आर. डी. जाधव, उषा कोकणे, संध्या माते , स्नेहल पवार ,पौर्णिमा होनकळसे ,स्थानकप्रमुख वामन दगडे, रघुनाथ गेंगजे, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाचे संस्थापक विजय कदम आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल आणि आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालयात निळकंठ चिंचवडे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षर भारती, पुणे या संस्थेने शाळेस ६०० पुस्तके भेट दिली. या वेळी अजय भोसले यांनी विद्यालयाच्या फिरत्या वाचनालयाची माहिती दिली. या वेळी मुख्याध्यापक चारुहास चिंचवडे, संस्थेचे अध्यक्ष निळकंठ चिंचवडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. बाळू व्हावळ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)चिंचवड : येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान दिनानिमित्त रांगोळी प्रदर्शन, व्हिडिओ क्लिप, सी. व्ही. रामन यांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. भाषण, रांगोळी, निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष निळकंठ चिंचवडे यांनी विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे जीवनातील महत्त्व सांगितले. वर्षा औटी, मनीषा मोरे, चारुहास चिंचवडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. मुख्याध्यापिका भारती चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मनीषा मोरे यांनी आभार मानले.
चिंचवडमध्ये स्वाक्षरी अभियान
By admin | Updated: February 29, 2016 00:45 IST