शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमध्ये शुकशुकाट, महाराष्ट्र बंदचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:46 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

पिंपरी - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. त्यामुळे बुधवारी महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. महापालिकेत शुकशुकाट होता. तर बुधवारी होणारी विविध विकासकामांची उद्घाटनेही रद्द करण्यात आली.महाराष्टÑ बंदचा परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये जाणवला. पुणे-मुंबई महामार्गावर महापालिका भवन आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध सुरू असल्याचे समजल्याने नागरिकांनी महापालिकेत येणे टाळले. महापालिका क्षेत्रातील आठही प्रभागातील अधिकारीही प्रभागातच होते. तसेच नगरसदस्यांनीही महापालिका भवनात येण्याचे टाळले. तसेच परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. त्यामुळे महापालिका भवनात होणारी नागरिक, नगरसेवक, अधिकारी यांची गर्दी आज दिसून आली नाही. प्रमुख अधिकाºयांचीही अनुपस्थिती दिसून आली. कोरेगाव भीमा येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांस श्रद्धांजली वाहून स्थायी समितीची साप्ताहिक सभाही तहकूब करण्यात आली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक दहामधील पिंपरी येथे उभारलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटनाचे नियोजन केले होते. मोठ्याप्रमाणावर सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, हा सोहळा साधेपणाने करण्यात आला. महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम : बचत गट मेळावा स्थगितदरम्यान चिंचवड के. एस. बी. चौकातील निगडी ते भोसरी रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दुपारी तीनला होणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसेच दुपारी सव्वा तीनला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे महिला बचतगटांचा मेळावा स्थगित करण्यात आला. मात्र, स्मारकाजवळ शारदा मुंडे यांचा होय मी सावित्री बोलतेय... हा एकपात्री कार्यक्रम सादर झाला.कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी शांतता राखावी. जातीय सलोखा राखावी. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व सोशल मीडियावर अफवा न पसरवता सर्वांनी शांत राहून संयम राखण्याचे आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.- नितीन काळजे, महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड