शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाचा धिंगाणा

By admin | Updated: November 28, 2015 00:41 IST

गत महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शहरवासीय दहशतीखाली असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा तडीपार गुंडाने चिंचवड येथे वाहनांची तोड करीत दहशत माजविली

पिंपरी : गत महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शहरवासीय दहशतीखाली असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा तडीपार गुंडाने चिंचवड येथे वाहनांची तोड करीत दहशत माजविली. आनंदनगर येथे गुरुवारी रात्री साडेदहाला हा प्रकार घडला.अविनाश पवार (रा.आनंदनगर चिंचवड) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. चिंचवड येथील आनंदनगर येथे गुरुवारी (दि. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास अविनाश पवार व त्याच्या चार साथीदार हातात हॉकी स्टिक, लोखंडी हत्यार घेऊन या ठिकाणी आले. आनंदनगर परिसरात असलेल्या, तसेच रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडून तोडफोड करायला सुरुवात केली. दिसेल त्या वाहनाच्या काचा फोडल्या. यामध्ये ४ दुचाकी, रिक्षा, मोटार या वाहनांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तोडफोडीनंतर हे टोळके तेथील रहिवासी आकाश अहिवळे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातील कपाट व टीव्हीची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने दगडफेकही करून दहशत माजविली. दरम्यान, पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच पवार व त्याचे साथीदार पसार झाले. पोलीस रात्रभर आरोपींचा शोध घेत होते.अचानक घडलेल्या तोडफोडीत नुकसान झालेल्या वाहनमालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरुन पोलिसांना घेराव घालून घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न करुन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून ठिकठिकाणी पोलीस तैनात केले होते.कोम्बिंग आॅपरेशन कशासाठी? तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी विद्यानगर, आनंदनगर, दत्तनगर, रामनगर, मोहननगर, इंदिरानगर या भागात कोम्बिंग आॅपरेशन केले होते. या वेळी त्यांनी मारहाण, लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यामुळे नागरिकांनीही पोलिसांचे पुष्पगु्च्छ देऊन स्वागत केले होते. कोम्बिंग आॅपरेशनमध्ये पोलिसांना पवारसारखे गुन्हेगार का सापडत नाहीत? मग कोम्बिंग आॅपरेशन कशासाठी, असा प्रश्न होत आहे. (प्रतिनिधी)