शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:42 IST

आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. 

ठळक मुद्देपिंपरी रेल्वे स्थानक प्रवासी घालताहेत जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कोयना एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन मुले ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोकलमधून उतरून रुळ ओलांडत असताना, ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रशस्त असा पादचारी पूल उभारला आहे. या पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. जोखीम पत्करून शॉर्टकट म्हणून अनेकजण रुळ ओलांडतात. ही परिस्थिती पिंपरीसह अन्य रेल्वे स्थानकांजवळ नेहमी पहावयास मिळते. आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान धावणार्‍या लोकल रेल्वेगाड्यांबरोबर या मार्गे धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची संख्याही मोठी आहे. लोकल गाड्यांच्या लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा या मार्गावर दर तासाला फेर्‍या सुरू असतात. वेळापत्रकानुसार या मार्गावरून विविध एक्सप्रेस गाड्या धावतात. मुंबईतील परेल एलफिस्टन रस्ता येथील रेल्वे स्थानकावर पूल पडला, अशी अफवा पसरल्याने एकच गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. ४ ऑक्टोबरला घडलेल्या या दुर्घटनेत २९ जणांचा बळी गेला. मुंबईतील रेल्वे पादचारी पुलांचा सर्रास वापर होतो. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक लोक या पुलावरून ये-जा करतात. याउलट परिस्थिती पुणे ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर पहावयास मिळते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या पादचारी पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. पुलावरून जाण्यापेक्षा शॉर्टकट म्हणून ते राजरोसपणे रुळ ओलांडतात. 

पादचारी पुलावर भिकार्‍यांचा ठिय्या पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून होत नाही, त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांवरही प्रवासी दिसून येत नाहीत. या पुलाच्या पायर्‍यांवर काही ठिकाणी भिकारी झोपलेले दिसतात, तर काही पायर्‍यांवर गदरुल्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येते.रेल्वे स्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना वेळोवेळी सुरक्षिततेसंबंधी सूचना दिल्या जातात. प्रवाशांनी धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडण्याची घाई करू नये. त्यांनी पादचारी पुलाचाच वापर करावा, असे निवेदन ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी केले जाते. परंतु त्या निवेदनाची अनेक प्रवासी गंभीर दखल घेत नाहीत.  रुळ ओलांडण्याचे प्रकार आकुर्डी, चिंचवड, कासारवाडी, दापोडी, खडकी रेल्वेस्थानकावरही पहावयास मिळतात. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी