शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

टपाल कार्यालयांमध्ये एटीएम कार्डचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:38 IST

प्रशासन विभागाचे आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना देण्याकडे दुर्लक्ष

पिंपरी : आधुनिकतेशी सांगड घालत टपाल कार्यालयानेही खातेदारांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या कार्डचा सतत तुटवडा भासत असल्याने ही सुविधा असूनही त्याचा खातेदारांना लाभ घेता येत नसल्याचे दिसून येते.सध्या विविध बँकांनी ग्राहकांच्या सोईसाठी एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठिकठिकाणी एटीएम केंद्र उपलब्ध असल्याने अनेकजण एटीएम कार्डचा वापर करतात. त्यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच दुकानांसह अनेक ठिकाणी स्वाईप मशिन उपलब्ध असल्याने कॅशलेस व्यवहार करणेही शक्य झाले आहे. बँकांच्या बरोबरीने तीन वर्षांपूर्वी टपाल खात्यानेही ग्राहकांसाठी एटीएम सुविधा सुरू केली. मात्र, ही सुविधा सुरू करीत असताना हव्या तितक्या प्रमाणात कार्डची सेवा उपलब्ध करून न दिल्याने या सुविधेचा काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.पिंपरी उपटपाल कार्यालयाकडून अद्यापपर्यंत केवळ १७४ एटीएम कार्ड वितरित केले आहेत. सुरुवातीला या कार्यालयाला कार्ड उपलब्ध झाले. त्यानंतर कार्ड आलेच नाहीत. त्यामुळे खातेदारांनाही कार्ड देणे शक्यनाही. खातेदार कार्डची मागणीकरीत असतानाही कार्ड देणे शक्य होत नाही. त्यामुळे खातेदारांची गैरसोय होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पिंपरीतील उपटपाल कार्यालयात हजारो खातेदार असताना एटीएम कार्ड मात्र अवघी १७४ उपलब्ध झाली आहेत. मागणी करुनही हे कार्ड उपलब्ध होत नसल्याने अनेक खातेदार या सुविधेपासून वंचित राहत आहेत.एटीएम कार्डअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी टपाल कार्यालयाचे खातेदार असलेल्या खातेदारांना एटीएम कार्ड लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड