शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ खरेदी : तीन अधिका-यांवर दंडात्मक कारवाई, अनियमिततेमुळे रोखली वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:29 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील २००९-१० या आर्थिक वर्षासाठीच्या बूट, रेनकोट, पावसाळी साधनखरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील २००९-१० या आर्थिक वर्षासाठीच्या बूट, रेनकोट, पावसाळी साधनखरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई झाली आहे. निवृत्त लेखाधिकारी, मुख्य लिपिक यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तर, सध्या सेवेत असलेल्या लिपिकाची वेतनवाढ रोखण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.महापालिका शिक्षण मंडळातील निवृत्त लेखाधिकारी शहाजी लालासाहेब निगडे, मुख्य लिपिक देविदास रामचंद्र काटे आणि सध्या सेवेत असलेले लिपिक अरुण हरिभाऊ जागडे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील शालेय साहित्य, बूट, रेनकोट खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार आली होती. त्यानुसार खरेदीची चौकशी करण्यात आली होती. साधने खरेदीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. खरेदीत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शहाजी निगडे, कल्पना साळवी, रामचंद्र काटे, अरुण जागडे यांची खातेनिहाय चौकशी केली होती.अहवालातील निष्कर्षानुसार विनाशुल्क निविदा फॉर्म देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान करणे, वरिष्ठांची मान्यता न घेणे, नोंदी न करणे, अनर्हत ठेकेदारांचे पाकीट उघडणे, कर्मचाºयांवर नियंत्रण न ठेवणे, मुदतीपश्चात निविदा फॉर्म विनाशुल्क देणे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शहाजी निगडे, रामचंद्र काटे, अरुण जागडे यांच्यावर दोषारोप ठेवले होते. उपलेखापाल कल्पना साळवी यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत.न्यायालयात दावा प्रलंबितआयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवृत्त लेखाधिकारी शहाजी निगडे यांच्या देय निवृत्तिवेतनातून दंडात्मक कारवाईपोटी पाच हजार तीनशे रुपये वसूल करण्याचे, तसेच देविदास काटे यांच्याकडून दोन हजार तीनशे वसूल करण्यास आणि लिपिक अरुण जागडे यांची एक वेतनवाढ रोखण्यास, तसेच विनाशुल्क दिलेल्या निविदा फॉर्मची किंमत तीनशे रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अरुण जागडे यांना यापुढे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवानोंद पुस्तकातही घेण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणी शहाजी निगडे यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, तो सुनावणीसाठी प्रलंबित आहे.