शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत माथाडी कामगारांच्या त्रासामुळे औषध विक्रेत्यांनी दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 19:11 IST

माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून पैशांची मागणी

ठळक मुद्देचिंचवड स्टेशन : कारवाईचे पोलिसांकडून आश्वासन  पिंपरी-चिंचवड शहरात औषधांचे सुमारे ४०० घाऊक विक्रेते

पिंपरी : विक्रीचे साहित्य व औषधे वाहनातून आले असता त्यासाठी माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातील घाऊक औषध विक्रेत्यांनी बुधवारी सकाळी दुकाने बंद ठेवली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी विक्रेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच यापुढे कोणताही त्रास होणार नाही, याची ग्वाही देऊन आश्वस्त केले. त्यानंतर विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली.चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातील घाऊक विक्रेत्यांनी मागणी केलेली औषधे तसेच इतर साहित्य घेऊन वाहने दवा बाजारात बुधवारी सकाळी पोहचली. त्या वाहनांसोबत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीकडून आलेले कामगार होते. ते कामगार औषधे तसेच विक्रीचे साहित्य उतरवत असताना काही जण तेथे आले. आम्ही माथाडी कामगार असून, हे साहित्य येथे उतरवायचे असल्यास त्याचे पैसे द्या, असे म्हणाले. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाºयांनी दवा बाजारातील औषध विक्रेत्यांना याबाबत माहिती दिली. तसेच वाहनातून साहित्य आम्ही उतरवून देणार आहोत, त्यामुळे पैसे कशासाठी द्यायचे, असे म्हणून त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीने विक्रीचे साहित्य तसेच औषधे उतरवून न देता परत घेऊन गेले.   

विक्रीचे साहित्य तसेच औषधे न मिळाल्याने विक्रेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच माथाडी कामगार म्हणून त्रास देणाºयांबाबत योग्य निर्णय होईपर्यंत दुकाने उघडणार नसल्याची भुमिका व्यापाºयांनी घेतली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दवा बाजाराला भेट दिली. तेथील विक्रेत्यांशी चर्चा केली. विक्रेत्यांना यापुढे कोणाचाही त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली.

.................

पिंपरी-चिंचवड शहरात औषधांचे सुमारे ४०० घाऊक विक्रेते आहेत. त्यातील ११५ विक्रेते चिंचवड स्टेशन परिसरात व तेथील दवा बाजारात आहेत. या विक्रेत्यांना माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून त्रास देण्यात येतो. तो थांबावा, अशी आमची मागणी आहे.- संतोष खिवंसरा, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.

.........................

औषध विक्रेत्यांशी चर्चा केली आहे. परिसरातील माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यातील बोगस माथाडींवर योग्य कारवाई करण्यात येईल. - अन्सार शेख, सहायक पोलीस निरीक्षक, निगडी