भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का'! पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 03:38 PM2021-09-22T15:38:22+5:302021-09-22T15:46:52+5:30

पिंपरी: मावळचे खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne) यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे (gajanan chinchavade) यांनी भाजपत प्रवेश केला ...

shivsena pune district chief gajanan chinchwade joins bjp political news | भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का'! पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपात

भाजपचा शिवसेनेला 'दे धक्का'! पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे भाजपात

Next
ठळक मुद्देगजानन चिंचवडे हे श्रीरंग बारणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते.सध्या महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक आहेत

पिंपरी: मावळचे खासदार श्रीरंग बारणे (shrirang barne) यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे (gajanan chinchavade) यांनी भाजपत प्रवेश केला आहे. पत्नीला महापालिका गटनेतेपदी डावलल्याने त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तर तिसऱ्या स्थानावर शिवसेना (pune shivsena) आहे. सध्या महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक आहेत.

६ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण मंडळ आणि पीसीएमटीचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या दोनदा चिंचवडगाव प्रभागातून निवडूण आल्या आहेत. स्थायी समिती सदस्यपद आणि गटनेतापदी डावलल्याने चिंचवडे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. तसेच ते खासदार श्रीरंग बारणे यांचे खंदे समर्थकही होते.

त्यामुळे आता चिंचवडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. मुंबईत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. यावेळी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, प्रवक्ते अमोल थोरात उपस्थित होते.

Web Title: shivsena pune district chief gajanan chinchwade joins bjp political news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.