शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कार्यालयावरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:41 IST

महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालयावरून माजी पदाधिकारी आणि विद्यमान पदाधिकारी यांच्यात जुंपली आहे.

पिंपरी : महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालयावरून माजी पदाधिकारी आणि विद्यमान पदाधिकारी यांच्यात जुंपली आहे. भाजपाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी अर्वाच्य शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप शिवसेना पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी केला आहे. तर आमच्या ताब्यातील मालमत्तेचे कुलूप तोडून बळकावण्याचा प्रकार केला असल्याची तक्रार सावळे आणि कामतेकर यांनी पोलिसांत केली आहे.एमआयडीसी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीचा अर्ज दिला आहे. तक्रारीची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालय मालमत्ता हक्कावरून आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ननावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यालय आमचेच आहे, असा दावा केला आहे. तसेच सावळे यांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळीची क्लीप माध्यमांना ऐकविली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अनंत कोºहाळे, रोमी संधू, संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.ननावरे म्हणाले, ‘‘महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत ३२ वर्षांपासून शिवसेना शाखा कार्यालय आहे. या शाखेची महापालिकेत शिवसेना कार्यालय अशी नोंद केली आहे. शिवसेनेतर्फे मालमत्ताकरही महापालिकेकडे भरला जात आहे. भाजपा नगरसेविका सावळे आणि कामतेकर यांनी कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पिंपरी विधानसभा संघटक म्हणून आपण याला तीव्र विरोध केला. तसेच जागेचा ताबा देणार नाही, असे स्पष्ट बजावले. यातून १९ जुलै रोजी त्यांनी मोबाइलवरून शिवीगाळ करत दमदाटी केली. धमक्या दिल्या. ’’‘‘कार्यालयाच्या कर पावतीची झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन कार्यालयातही नोंद आहे. त्यासाठी या कार्यालयाचा ताबा शिवसेनेकडे देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.दरम्यान मालमत्तेवर सारंग कामतेकर यांनीही दावा केला आहे. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या शाखा या जय भवानी ट्रस्टच्या नावावर नोंदविल्या जातात. संबंधित कार्यालय संबंधित ट्रस्टच्या नावावर नाही. मी उपशहरप्रमुख असताना संबंधित कार्यालय सुरू केले. लाईटबिल माझ्या नावावर आहे. २००५ मध्ये झोपडपट्टी सर्वेक्षण झाले. त्या वेळी कार्यालय बंद होते. म्हणून शिवसेना नोंद आहे. हे कार्यालय आम्ही आमच्या खर्चातून बांधले. त्यातील फर्निचर केले. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहे. आयकर विवरणामध्ये खर्च केल्याची नोंद आहे.’’>नगरसेविकेने असंसदीय शब्द वापरले आहेत. महिलांना लाजवेल अशी शिवीगाळ केली आहे. मी दलित आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करणार आहे. आम्ही कायदेशीरपणे कारवाई करणार आहे. शिवसेना कार्यालयाबाबत आजी माजी सदस्यांनी आपण कायदेशीर आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे पोलीस तपासात सत्य पुढे येईल.- जितेंद्र ननावरे, शिवसेना पदाधिकारीआमच्या ताब्यातील वास्तूचे १९ जुलैला टाळे तोडले. तेथील साहित्य गायब झाले. मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. टाळे तोडल्याची कबुली संबंधितांनी दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन वास्तुच्या चाव्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. न्यायालयात जाणार आहे. - सारंग कामतेकर, सरचिटणीस भाजपा

टॅग्स :Shiv Senaशिवसेना