शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 17:26 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे.

पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे. कलाटे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या महिला सदस्यांनी केली आहे. तर  ‘‘माई मला आईसारख्या असून महापौर झाल्यापासून त्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रिमोटकंट्रोलने सभागृह चालवित आहेत, विरोधकांचा आवाज दाबत आहे, ग्लास फेकून मारला नाही, फोडून निषेध केल्याचे उत्तर कलाटे यांनी दिले आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  विषयपत्रिकेवरील करवाढीच्या प्रस्तावर  चर्चा सुरु होती. करवाढीचा विषय असताना शिवसेनेच्या वतीने भूमिका मांडण्याची मागणी तीन वेळा राहुल कलाटे यांनी  केली होती. मात्र महापौरांनी संधी न दिल्याने कलाटे संतप्त झाले. महापौरसाहेब तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करता, तुमच्याकडून हे अपेक्षीत नाहीत. तरीही बोलू न दिल्याने पाण्याचा ग्लास टेबलवरुन खाली आपटला. महापौरांचा निषेध केला. त्यावर महापौर संतप्त झाल्या. तुम्ही खाली बसा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. त्यानंतर सलग दोन मिनिटे चाललेल्या गोंधळाचा फायदा घेत विषय मंजूर केले. तर भाजपाने राहुल कलाटे यांनी महापौरांचा अवमान केल्याचा कांगावा केला. तसेच कलाटे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.  

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले,  ‘‘अनुभवी असलेल्या उषा ढोरे महापौर झाल्यापासून महासभेत गोंधळ सुरु आहे. महापौरांची  पहिलीच सभा तहकूब झाली होती. दुसरी सभाही गोंधळातच तहकूब झाली होती. मागील काही सभा गोंधळातच पार पडत आहेत. त्यांच्याकडून दादागिरी केली जाते. महापौर ढोरे नव्हे तर आमदार लक्ष्मण जगताप सभागृह चालवितात. त्यांच्या रिमोट कंट्रोलवरच महापौरांकडून सभागृह चालविले जाते. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. करवाढीच्या महत्वाच्या विषयावर महापौर ढोरे यांनी मला बोलू दिले नाही. महापौरांच्या हौदासमोरील रचना देखील बदलले आहे. राजदंडापर्यंत पोहचू नये यासाठी फर्निचर बसवून घेतले आहे.’’महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘कलाटे यांना संधी दिली होती. त्यांचे आजचे वर्तन योग्य नाही. मी कोणावरही अन्याय करीत नाही. त्यांनी वर्तनात सुधारणा करायला हवी. ’’

टॅग्स :Mayorमहापौरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड