शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:23 IST

संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरी झाली आहे. सोमवारी गुन्हा घडला असताना तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणा-यांनीच केली असावी

पिंपरी : संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरी झाली आहे. सोमवारी गुन्हा घडला असताना तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणा-यांनीच केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असून, याप्रकरणी दोन सुरक्षारक्षकांची बदली केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी आजपर्यंत ४ मगरींचा मृत्यू, ७ मगरी गायब, ५० मृत सापांचा खच, २ अजगर गायब, किंग कोब्राचा मृत्यू, कासवाची पिलेचोरी असे प्रकार घडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने निर्णय घेतलेले नाही. प्राणिसंग्रहालयातील प्राणिसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना घडल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, उद्यान विभागाचे प्रमुख सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते. तसेच तक्रार दाखल करण्यास वेळ का लागला, याची चौकशी केली जाणार आहे. भारतीय जातीचे दोन अजगर असून, त्यातील एक अजगर साडेसात फूट लांबीचा आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला साप कसे पकडतात किंवा कसे हाताळतात, याची माहिती असणारी व्यक्तीच ही चोरी करू शकते, असा अंदाज प्राणिप्रेमींनी व्यक्त केला आहे.सीसीटीव्ही बसविणारआजवर झालेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, तसेच सुरक्षारक्षक वाढवावेत, रात्रीची गस्त वाढवावी अशा सूचना केल्या. चोरी झाली त्या वेळी कामावर असणाºया दोन सुरक्षारक्षकांची बदली केली असून, त्याजागी दुसरे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. तसेच आणखी एक सुरक्षारक्षक वाढविला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यास तीन दिवसांचा कालावधी का लागला, याचीही चौकशी करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.सर्पोद्यानाला केंद्र सरकारच्या झू अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या नवीन आराखड्यानुसार नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १४४ कोटी मंजूर झाले असून, कामांचे भूमिपूजन झाले. या नूतनीकरणामध्ये प्राणिसंग्रहालयात उभयचर प्राण्यांसाठी कक्ष निर्माण करणे, सरपटणाºया प्राण्यांसाठी घाट निर्माण करणे, प्रेक्षक दालन तयार करणे, मगर, सुसर, कासव यांसारख्या प्राण्यांसाठी तलाव निर्माण करणे आदी कामे केली जाणार आहेत.