शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ रमताहेत विरंगुळा केंद्रात

By admin | Updated: November 17, 2016 03:21 IST

आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करून उतारवयात मनाला शांतता मिळावी, थोडा विरंगुळा व्हावा, यासाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आता शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत.

भोसरी : ज्येष्ठ नागरिक हे नेहमीच समाजासाठी मार्गदर्शक असतात. आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करून उतारवयात मनाला शांतता मिळावी, थोडा विरंगुळा व्हावा, यासाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आता शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. पण पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले व मोठे ज्येष्ठांसाठीचे विरंगुळा केंद्र म्हणजे भोसरीतील सँडविक कॉलनी येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र. वारकरी परंपरा जपण्यासाठी दर वर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. सात दिवस ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होत असतात. वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी केली जाते. गरज वाटल्यास आॅपरेशन केले जाते व औषधे वाटपही केले जातात. निरामय आरोग्यासाठी नियमित योगसाधनेचे धडे ज्येष्ठांना दिले जातात. याचा चांगला लाभ सभासद, ज्येष्ठ नागरिकांना होताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाजाची मोठी संपत्ती आहे. बदलत्या जीवनशैलीत ज्येष्ठांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजातील ज्येष्ठ विचारांना एकत्र आणून त्याच्या आधारासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ स्थापला असून, विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आनंद देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना चांगला फायदा होत असल्याने समाधान आहे. सँडविक कॉलनीतील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करून नगरसेवक अजित गव्हाणे यांनी २०१२ मध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली व कै. धोंडिबा फुगे पाटील क्रीडा संकुलात विरंगुळा केंद्र सुरू करून तब्बल ११०० सभासदांना एकत्र केले. सर्वच सभासद आपल्या घराप्रमाणेच या विरंगुळा केंद्रात रमून जातात. ज्येष्ठांसाठी विविध सोयी येथे पुरवण्यात आल्या आहेत. एक छोटे वाचनालय, प्रथमोपचार केंद्र, पाणपोई, निसर्गरम्य परिसर, सायंकाळी विसावा घेण्यासाठी कट्टा, वॉकिंग ट्रॅक, स्वतंत्र कार्यालय अशा सोयीमुळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके वाचत विविध विषयांवर चर्चा करण्यात दंग असतात. (वार्ताहर)