शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच जमिनीची अनेकांना विक्री; चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 02:56 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना वाकड पोलिसांनी गजाआड केले.

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना वाकड पोलिसांनी गजाआड केले. त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.फसवणूकप्रकरणी संतलाल रोशनलाल यादव (वय ४७, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नथू चिंधू खिलारी (वय ५५), खंडू चिंधू खिलारी (वय ५२, रा. बोरज, मळवली, ता. वडगाव मावळ), बाबासाहेब तोलाजी चितळे (वय ४७), भाऊसाहेब बाबूराव काळे (वय ४५, रा. जोतिबानगर, काळेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर जितेंद्र रामदास तोरे (वय ४५, रा. जळगाव) हे पसार झाले आहेत. या आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना पिंपरी, मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील बाबासाहेब चितळे, भाऊसाहेब काळे आणि जितेंद्र तोरे यांनी संतलाल यादव यांना बोरज-मळवली येथील तीन गुंठे जमीन देतो, असे सांगून आठ लाख रुपये घेतले. वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करण्यात आली. तथापि, दीड वर्षे त्यांनी जागेचा ताबा देण्याकामी चालढकल केली. याप्रकरणी चौकशी केली असता, जागामालक नथू खिलारी, खंडू खिलारी यांनी यापूर्वीच ती जागा दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली असल्याचा प्रकार उघडकीस आला.बनावट सात-बारा, तलाठ्याचा खोटा शिक्का, खोटी स्वाक्षरी असल्याचे दस्तऐवज वापरून आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. संतलाल यादव यांच्यासह आणखी काही लोकांची आरोपींनी फसवणूक केली असण्याचीशक्यता आहे.