शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सदस्यांची २० एप्रिलला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:41 IST

महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

पिंपरी - महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती व्यतिरिक्त विधी समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती अशा चार समित्या आहेत. या समितीतील सदस्यांची मुदत एप्रिल अखेरला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.या विषय समित्यांची सदस्य संख्या ९ असते. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ आणि शिवसेनेचा १ सदस्य प्रत्येक समितीत जाणार आहे. नव्या सदस्यांची निवड एप्रिलच्या महासभेत केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात येईल. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सभापतींची निवड होईल. विषय समिती सदस्यपदावर संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी आतापासूनच नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे.महापालिकेत सत्तांतर झाले. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण झाले होते. त्यातून राजीनामानाट्यही रंगले होते. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. विषय समितीवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे. विषय समितीच्या सदस्यांची संख्या नऊ असते. पक्षीय बलानुसार भाजपाचे ५, राष्ट्रवादीचे ३ आणि शिवसेनेचा १ सदस्य असणार आहे. महासभेत निवडणूक झाल्यानंतर सभापतींची निवड होणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे