शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

By admin | Updated: March 5, 2017 04:24 IST

बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे (ता.मावळ) येथे कारवाई करुन ३,६८.०८७ रुपयांचा

वडगाव मावळ : बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे (ता.मावळ) येथे कारवाई करुन ३,६८.०८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकास अटक करण्यात आली असून उर्वरित दोन संशयीत आरोपींचा शोध सुरु आहे. नारायण प्रेमजी पटेल ( रा. कसबापेठ, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. निरीक्षक दीपक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटेल हा बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री विकत असल्याची माहिती मिळाल्याने तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. आरोपी पटेल दुचाकीवरून बनावट विदेशी स्कॉच मद्याच्या पाच बाटल्या घेऊन जात असल्याचे आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केला. त्यातून कृष्णकुंज ६८६ जुनी सांगवी ता. हवेली येथे छोटेखानी खोलीत एक लिटरच्या ७२ विविध ब्रँडच्या भरलेल्या बनावट विदेशी स्कॉचच्या सीलबंद बाटल्या तसेच एक लिटरच्या ७३ रिकाम्या बाटल्या व ब्रँडची बुचे, लेबल, खोके, पिशव्या व बनावटीचे इतर साहित्य असा एकूण ३,६८,०८७ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालातील ब्रँडची बाजारातील किमंत खिशाला न परवडणारी आहे. त्यामुळे त्याच नावाने बनावट मद्य कमी किंमतीत विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर येथे बनावट दारू पिवून मृत्युमुखी पडलेल्या घटना ताजी असतानाच या कारवाईस महत्व प्राप्त झाले आहे. (वार्ताहर)