शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सायन्स सिटी पिंपरी-चिंचवडमध्येच होणार, प्रकल्पाबाबत मुख्यमत्र्यांसोबत बैठक- दिपक केसरकर

By विश्वास मोरे | Updated: September 7, 2022 15:26 IST

केसरकर यांनी बैठकीत सायन्स सिटी प्रकल्पांचा आढावा घेतला

पिंपरी : पुणे-मुुंबई महामार्गावरील महापालिकेच्या वतीने उभारलेल्या विज्ञान केंद्रास राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. बैठकीत सायन्स सिटी प्रकल्पांचा आढावा घेतला. ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या समवेत सायन्स सिटीबाबत तातडीने बैठक घेण्यात येईल, तसेच सायन्स सिटी पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विज्ञान केंद्रास शिक्षणमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, युवक कल्याण आणि  क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी प्रभागअध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रकल्पाचे मुख्याधिकारी प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.सायन्स सिटीचे सादरीकरणसुरूवातीला केसरकर यांनी विज्ञान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर तुपे यांनी विज्ञान केंद्र आणि सायन्स सिटीचे सादरीकरण केले. सायन्य सिटीची सद्यस्थिती त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जागा उपलब्ध आहे का? याबाबत माहिती घेतली. प्रकल्पांची वैशिष्टे आणि मध्यवर्ती ठिकाणांबाबत माहिती घेतली. यावेळी क्रीडा आयुक्त दिवसे म्हणाले, ‘‘तीन जागांचा या प्रकल्पांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. एक जागा ऑटो क्लस्टर समोरील, दुसरी मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आणि निघोजे येथील जागेत हे केंद्र उभारले जाऊ शकते.’’

त्यावर खासदार बारणे आणि खापरे यांनी हे केंद्र शहरात व्हायला हवे, महापालिकेकडे जागा उपलब्ध आहे. तिथेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र उभारले जावे, अशी आग्रही भूमिका मांडली. तसेच जितेंद्र वाघ यांनी विज्ञान प्रकल्प आणि ऑटो क्लस्टर परिसरातील जागेचा विचार केला जाऊ शकतो. तसेच शेजारीच महापालिकेची नवीन इमारत प्रस्तावित आहे. त्याशेजारीच सिटी सेंटरचे आरक्षण आहे, सायन्स सिटीबाबत प्रकल्पांचा विचार केला जात असताना आरक्षण बदलावे लागणार आहे, याबाबत शासनस्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी भूमिका वाघ यांनी मांडली.

त्यानंतर सायन्स सिटी प्रकल्पाबाबत नगररचना विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेश तातडीची बैठक घेण्यात यावी, हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड मध्ये उभारला जाईल, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या नगरविकास विभागाला कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड