शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

झोपडपट्टी परिसरातील शाळा बनली ‘हायफाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:49 IST

महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी - महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. झोपडपट्टी भागातील या शाळेने विविध पुरस्कार पटकावत आदर्श शाळा होण्याचा मान मिळवला आहे.शाळेमध्ये सुमारे ६५० पटसंख्या आहे. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच शाळेतील स्वच्छता आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो. रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, गांडुळखत प्रकल्प, औैषधी वनस्पती लागवड, कुंडी प्रकल्प असे पर्यावरणपूरक प्रकल्प राबविले जातात. शाळा डिजिटल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पालक, शिक्षक व विविध संस्थांनी विशेष मदत केली. जानकीदेवी बजाज यांनी ई-लर्निंगसाठी १० संगणक शाळेला दिले. शाळेमध्ये वाचनालय, प्रयोग शाळा, ई-लर्निंग विभाग व विविध खेळाचे साहित्य आहे. त्यामुळे पटसंख्या वाढली आहे. शाळेमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांना संगणकीय ज्ञान दिले जाते. चित्रफितीच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होते. शाळेमध्ये सुसज्ज असे वाचनालय आहे़ त्यामुळे वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाप्रमाणेच संस्कारांचे धडे दिले जातात. मुलांनी बाल गुन्हेगारीपासून दूर राहावे यासाठी पोलिसांकडून समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात.मुलांचे संख्याज्ञान वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मुलांनी बाल गुन्हेगारीपासून दूर राहावे यासाठी पोलिसांकडून समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात. व्यसनाधिनतेपासून कसे दूर राहावे यासाठी शिबिरे घेतली जातात. इतर खासगी शाळेतील विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असतात. अशाप्रकारे महापालिकेच्या प्रत्येक शाळांनी डिजिटलसाठी प्रयत्न केले तर मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का वाढेल. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून एक संस्कारक्षम व डिजिटल युगात वावरणारी पिढी निर्माण होईल.स्वच्छतेसाठी पुढाकारशाळेचा परिसर चांगला राहावा यासाठी सुरक्षारक्षकापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळेच काळजी घेतात. सुरक्षारक्षक गोविंद ठोकळ यांनी वृक्ष संवर्धनासाठी उन्हाळ्यात सुटी न घेता झाडांचे रक्षण केले. शाळेमधील मुख्याध्यापिका रजनी सैद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यासाठी शिक्षक सतीश पाटील नेहमी कार्यरत असतात. पर्यावरणाचे प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षिका वर्षा सावंत हे प्रयत्न करतात.शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. विविध सोयीसुविधा असल्यामुळे पटसंख्या वाढली आहे. अनेक खासगी शाळांचे विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळा डिजिटल होण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत.- रजनी सैद, मुख्याध्यापिकाशाळा डिजिटल करण्यासाठी अनेक संस्थानी आमच्या पाठीवर हात ठेवला़ त्यामुळे आम्ही या भागामध्ये एक आदर्श शाळा निर्माण करू शकलो. सर्व शिक्षकांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्मचारी जीव ओतून शाळा सुधारणेसाठी प्रयत्न करतो.- सतीश पाटील, शिक्षक.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्र