पिंपरी : दहशत माजविण्याच्या उद्देशाने चिंचवडगाव पागेची तालीम येथे वाहनतळावर उभी मोटार अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली. या घटनेत मोटार खाक झाली आहे. गिरीश युवराज चौधरी (वय ३३) यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.चिंचवडगाव येथील द्वारका आर्या सोसायटीच्या आवारात एमएच १४ डीएफ ८१९६ या क्रमांकाची मोटार अज्ञात आरोपींनी पेट्रोल टाकून जाळली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी या मोटारीवर रात्री एकच्या सुमारास पेट्रोल टाकले. आगपेटीने मोटारीला आग लावली. ही मोटार खाक झाली. त्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जळालेल्या मोटारीजवळ लावलेल्या आणखी एका मोटारीचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
दहशतीसाठी जाळली मोटार
By admin | Updated: March 23, 2017 04:27 IST