शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

देशसेवा हाच सावरकरांचा ध्यास - शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:21 IST

विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरले आहेत. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता.

पिंपरी : विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन आणि विचार राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरले आहेत. देशसेवा हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांना एका विशिष्ट साचामध्ये बांधून ठेवले, त्यामुळे त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यात अडथळे आले, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यात शरद पोंक्षे बोलत होते. कार्यक्रमात आपलं घर पुणेचे संस्थापक विजय गजानन फळणीकर यांना यावर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार देवमहाराज, विश्राम देव, आनंद तांबे, अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, गजानन चिंचवडे, डॉ. प्रवीण दभडगाव आदी उपस्थित होते.या वेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, गिरिजा लांडगे, रमाकांत परांजपे, रमाकांत पवार, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अनिल गुंड, प्रा. राजकुमार कदम, स्नेहवनचे अशोक देशमाने, सुनील तापकीर, किसन चौधरी, अक्षय घाणेकर, चलसानी व्यंकटसाई, श्रीकांत देव आदींना मोरया पुरस्कार देऊन गौरविले.शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘सावरकरांनी २२ हजार पानांचे साहित्य लिहिले आहे. मित्रमेळा नावाच्या संघटनेपासून अभिनव भारत संघटना त्यांनी स्थापन केली. यामागे केवळ राष्ट्रभक्तीच होती. लहानपणापासून त्यांच्यात संपूर्ण स्वातंत्र्याचे बीज पेरले गेले होते. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिंदुत्वाचा पुरस्कार केला. धर्माबद्दलची कट्टरता नको, कट्टरता राष्ट्रभक्तीची असायला हवी. सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला हव्यात. तसेच स्वातंत्र्यानंतर एका वर्षात भारताने अण्वास्त्र निर्मितीमध्ये प्रगती करायला हवी, असा सावरकरांचा नेहमी आग्रह होता. आज प्रत्येक नागरिकाने गरजेपुरतेच आर्थिक सक्षम व्हायला पाहिजे. त्यानंतरचा सगळा वेळ राष्ट्रभक्तीसाठी द्यायला हवा. आज पुन्हा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढण्याची गरज नाही. किंवा केवळ त्याच माध्यमातून देशभक्ती होते असे नाही. तर दररोजच्या नियमित कामामधूनसुद्धा देशभक्ती जगवता येते.’’बुधवारी सकाळी सहाला गोंदवलेकरमहाराज आरती मंडळाने काकड आरती केली. त्यानंतर श्री मोरया गोसावी चरित्र पठण केले. सकाळी नऊला महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण व कुंकुमार्जन झाले. याचे संचालन विद्या विघ्नहरीमहाराज देव यांनी केले. तर संयोजन नारायण लांडगे यांनी केले. वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. याचे संयोजन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड