शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

मिळकत करासाठी शनिवारची मुदत

By admin | Updated: December 25, 2016 04:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाची मिळकत कराची बिले वाटप करण्यात आली असून, मिळकत कर हा १ एप्रिल ते १ आॅक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या सहामाही हिश्श्याने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या वर्षाची मिळकत कराची बिले वाटप करण्यात आली असून, मिळकत कर हा १ एप्रिल ते १ आॅक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या सहामाही हिश्श्याने आगाऊ देय असतो. त्यानुसार थकबाकीसह पहिल्या सहामाही व दुसऱ्या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबर २०१६अखेर भरणे आवश्यक आहे. त्यामुळे मिळकतधारकांकडे आता थकबाकीसह कराची रक्कम भरण्यासाठी शेवटचे आठ दिवस उरले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१६ अखेर मिळकतधारक यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कर बिलाची रक्कम भरणा केला न केल्यास थकीत थकबाकीसह पहिल्या व दुसऱ्या सहामाही अखेरच्या रकमेमधील करावर दरमहा २ टक्के, तर शासन करावर वार्षिक १० टक्के शास्ती व व्याजाची आकारणी १ जानेवारी २०१७पासून केली जाणार आहे.महापालिकेच्या १६ कर आकारणी कार्यालयामध्ये साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, तरी मिळकतधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी थकबाकीसह संपूर्ण बिलाची रक्कम भरून शास्ती टाळावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तर शुक्रवारअखेर ४ लाख ४४ हजार ७०९ मिळकतींच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार ९३१ मिळकतधारकांकडून ३११.५८ कोटी मिळकत कराचा भरणा केला आहे. हा भरणा मागील वर्षीच्या झालेल्या भरण्यापेक्षा ४७.२५ कोटीने जास्त आहे. (प्रतिनिधी)