शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीफाटा जणू मृत्यूचा सापळा

By admin | Updated: October 19, 2015 01:44 IST

पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीपिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, याचा फायदा वाहनचालकांना होत नसून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे. सांगवी फाटा येथे बीआरटीएस रस्त्यावर अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाल्या फळविके्रत्यांमुळे या ठिकाणी बाजाराचे स्वरूप येत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. सांगवी फाटा म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचे दिसत असल्याने महापालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.सांगवी फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. या मार्गाने मावळ, मुंबई, पिंपरी-चिंचवड या परिसरात नागरिक जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेत फळविक्रेत्यांनी चौकाच्या पुढे बीआरटीएस रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. खरेदी करण्यासाठी ग्राहक वाहतूक नियमांचे पालन न करता अचानक वाहन थांबवितात. अचानक वाहने वळविली जातात. तेथे काही वेळा भांडणाचे प्रकारही घडत आहेत. धोकादायक परिस्थिती असूनही ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग कारवाईबाबत उदासीन आहे. भर रस्त्यावर राजरोस अनधिकृत व्यवसाय सुरू असतानाही महापालिकेचे अधिकारी डोळेझाक करीत आहे. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.रस्ता रुंदीकरणाचा उद्देश कामचुकार व निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे साध्य होत नाही.अनेक वेळा अनधिकृत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु, ज्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, अशा ठिकाणी कारवाई होत नाही. एखाद्या चौकात अनेक व्यावसायिक असल्यास त्यावर कारवाई होत नाही. मात्र, एखादा हातगाडीवाला रस्त्याच्या कडेला व्यवस्थित व्यवसाय करीत असेल, तर त्याच्यावर हमखास कारवाई होते. सांगवी फाटा, रहाटणी फाटा, शिवार चौक, तापकीर चौक, पाचपीर चौक अशा ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित असूनही होत नाही. केवळ कारवाईचा आव आणला जातो. मात्र, गल्लीबोळात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. अशा चौकांतील हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक निघताच हातगाडीवाले बेपत्ता होतात. हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.आधुनिक उपनगर म्हणून पिंपळे सौदागरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परिसरात कोकणे चौक, गोविंद यशदा चौक व शिवार चौक असे तीन मोठे चौक आहेत. शिवार चौकाची अवस्था फार बिकट आहे. या चौकाला सकाळी -संध्याकाळी यात्रेचे स्वरूप येते. या दोन्ही वेळा शहरातील इतर ठिकाणांहून व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी येतात. शेकडो गाड्या रस्त्यावर लागलेल्या असतात. त्यामुळे सायंकाळी -सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या स्वच्छ सुंदर चौकाला बकाल स्वरूप आले आहे.