शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:59 IST

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सुनील शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.

तळेगाव दाभाडे  - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक संग्राम काकडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सुनील शेळके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी त्यांना मदत केली. नगर परिषदेत भाजपा १४, जनसेवा विकास समिती ६, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६ नगरसेवक असे पक्षीय बलाबल असून, भाजपा, जनसेवा विकास समिती, आरपीआय (आठवले गट) महायुतीची नगर परिषदेत सत्ता आहे.जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे अरुण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज वैध ठरले. सुनील शेळके यांनी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांच्याकडे अरुण माने यांचा अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. त्यांचा आदर ठेवून किशोर भेगडे यांनी माने यांचा अर्ज मागे घेतला. आगामी काळातही तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती शहराच्या विकास कामासाठी पूर्ण सहकार्य करील; परंतु सर्व प्रभागांत निष्पक्षपणे विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा किशोर भेगडे यांनी व्यक्त केली.माने यांच्या माघारीनंतर संग्राम काकडे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चित्रा जगनाडे यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्ष काकडे यांच्या अभिनंदनपर झालेल्या सभेत आमदार संजय भेगडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, पक्षप्रतोद सुशील सैदाणे, विशाल खंडेलवाल, अ‍ॅड. रवींद्रनाथ दाभाडे , संतोष दाभाडे पाटील, माजी उपनागराध्यक्ष सुनील शेळके,चंद्रभान खळदे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचनाताई आवारे यांचे भाषण झाले.या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, मुख्य प्रवर्तक किशोर आवारे,पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम,माजी सभापती निवृत्ती शेटे,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे,संत तुकाराम कारखान्याचे संचालक गोपीचंद गराडे, हभप नितीनमहाराज काकडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत काकडे,बाबा शेट्टी उपस्थित होते.कारकिर्दीत सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन शहर विकासाला पूरक असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी गतिमान करण्याचे आश्वासन संग्राम काकडे यांनी दिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने शहर विकासाला प्राधान्य देत समन्वयाची भूमिका घेतल्याबद्दल नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष काकडे यांनी समितीचे आभार मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीस