शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजासाठी ओबीसी घटकातूनच आरक्षण द्यावे- संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 01:06 IST

मराठा समाजासाठी मंजूर केलेले १६ टक्के आरक्षणाचे विधेयक संवैधानिक नसून फसवे आहे.

पिंपरी : मराठा समाजासाठी मंजूर केलेले १६ टक्के आरक्षणाचे विधेयक संवैधानिक नसून फसवे आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्येच समावेश करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.पवार यांनी नमूद केले आहे की, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण म्हणून जे विधेयक विधिमंडळात सर्वानुमते मंजूर करून घेतलेले आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे नसून घटनाबाह्य आहे. हे सरकारला माहिती असूनही कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिलेले आहे असे दाखवून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. मराठा समाजाने आरक्षण आणि इतर १९ मागण्यांसाठी अभूतपूर्व आणि शिस्तबद्ध असे ५८ मोर्चे काढलेले आहेत.४२ पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने आरक्षण देण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही जातीचा केलेला नाही एवढा मोठा सर्वे मराठा समाजाचा केला आहे. मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेली दयनीय परिस्थिती अहवालात दिलेली आहे. त्या अहवालानुसार मराठा समाज ओब्उाीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरलेला असतानादेखील जाणीवपूर्वक मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर बेकायदा आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाने ओबीसीमध्ये समाविष्ट होण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. ते संवैधानिक मान्यता असलेले आरक्षण असल्यामुळे राज्य सरकारने राज्याची प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ केंद्र सरकारकडे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड