शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कर बुडविण्याच्या हेतूने आकुर्डीत साडेतीन कोटींची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:00 IST

आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अ‍ॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपिंपरी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखलआरोपींनी करबुडविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शासनाच्या महसूल उत्पन्नास पोहोचवली हानी

पिंपरी : आकुर्डी सर्कल, खंडोबा माळ येथील अ‍ॅडोर वेल्डिंग कंपनीच्या संचालकासह अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या विवरणपत्राच्या आधारे शासनाचा कर कमी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. ३ कोटी ४१ लाख ४३ हजार २१७ रुपए मूल्यवर्धीत कर बुडविल्याप्रकरणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाचा कोट्यवधी रकमेचा कर बुडविल्याप्रकरणी संजय शेडगे (वय ४५, रा. धनकवडी) यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅडोर कंपनीचे संचालक सतिश भट, मुख्य वित्त अधिकारी गिरीष पाटकर, प्रकल्प प्रमुख उल्हास पुजारी, वरिष्ठ अधिकारी राजेंद्रनाथ अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींनी खोटी विवरणपत्र तसेच खोटी टॅक्स इन्व्हाईस जोडून विक्रीकर देयता कमी दाखवली. त्यावरील १५ टक्के दराने मिळणारे वार्षिक व्याज बुडविण्याचा प्रयत्न केला. कंपनीशी व्यवहार झालेल्या व्यापाऱ्यांची खरेदी विक्रीची बिले तपासली. वाहन भाडे पावत्या तपासल्या. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे जाब जबाब घेतले. खर्चाच्या हिशोबाच्या वह्या, व्यक्तीगत डायऱ्या, इनवर्ड, आऊटवर्ड रजिस्टर, खरेदी विक्री बिले आदी व्यवसायाशी संबंधित दस्त आढळून आले. यातील आरोपींनी करबुडविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शासनाच्या महसूल उत्पन्नास हानी पोहोचवली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेतील कलमाच्या आधारे बनावट कागदपत्र  सादर करणे, फसवणूक करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मूल्यवर्धीत कायदा २००० नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड