शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात बॉम्बची अफवा

By admin | Updated: January 30, 2017 02:51 IST

येथील एसटी बसस्थानकात बॉम्ब असल्याचा फोन मंचर पोलीस ठाण्यात आला. या वेळी लगेच यंत्रणा तत्पर झाली. बॉम्बशोधक व नाशक पथक आले.

मंचर : येथील एसटी बसस्थानकात बॉम्ब असल्याचा फोन मंचर पोलीस ठाण्यात आला. या वेळी लगेच यंत्रणा तत्पर झाली. बॉम्बशोधक व नाशक पथक आले. राणी श्वानाच्या मदतीने बसस्थानकात कसून शोध घेण्यात आला. एका रसवंतीगृहात काळ्या बॅगेत असलेली ती बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात आली. यादरम्यान बघ्यांची एकच गर्दी झाली होती, नंतर हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मंचर येथील एसटी बसस्थानकात मॉकड्रिल पार पडले. बसस्थानक आवारात बॉम्ब असल्याचा फोन पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना गेला व सर्व यंत्रणा तत्पर झाल्या. मंचर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले पुणे येथून बॉम्बशोधक व नाशक पथक आले. या पथकातील राणी श्वानाने परिसर पिंजून काढला. यादरम्यान घोडेगाव, चाकण, राजगुरुनगर, खेड, आळंदी येथील पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला. रुग्णवाहिका,आगीचा बंब घटनास्थळी आला.पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. मांजरे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. घाटगे यांच्यासह ४५ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बॉम्बशोधक नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. एस. पी. पिलाने, विनोद गायकवाड, जे. एस. सापटे, प्रशांत भुजबळ, एस. एस. गिलबिले, नवनाथ नाईकडे, एस. वाय. चिमटे, मांजरे यांनी सहभाग. (वार्ताहर)