शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय ससेमिऱ्याचा बळी? स्वामी समर्थ शाळेच्या संचालकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:49 IST

इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती.

पिंपरी - इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती. या ससेमिºयामुळे शिक्षकाचा मृत्यू झाला, असा अरोप करून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच मृत्यू झालेल्या शिक्षकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती स्वामी समर्थ विद्यालयाचे संचालक यशवंत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्वामी समर्थ विद्यालयात पूर्वी काही दिवस नोकरी केलेले अशोक रघुनाथ खर्चे सध्या या शाळेत नोकरीस नाहीत. मात्र ते वारंवार माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवित होते. माहिती देण्याची जबाबदारी बोराटे या शिक्षकावर होती. मात्र खर्चे व त्यांच्या साथीदारांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्याचा ससेमिरा लावल्याने मानसिक त्रास होऊन बोराटे यांचे हृदयविकाराने निधन झाले, असा संचालक बाबर यांनी आरोप केला आहे. इंद्रायणीनगर येथे असलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण निघालेले नाही. काही राजकीय व्यक्तींमुळे अतिक्रमणझाले आहे, असेही मुद्दे बाबर यांनी उपस्थित केले.आरोप बिनबुडाचेमाहिती अधिकारांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून माहिती मागवली जात आहे. मुख्याध्यापकांच्या नावे माहिती अधिकारात अर्ज केले आहेत. मृत्यू झालेल्या चांगदेव बोराटे या शिक्षकाशी आपला काहीच संबंध नाही. शिक्षकाला ओळखतही नाही. स्वामी समर्थ विद्यालयाचे संचालक बाबर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. आरोप बिनबुडाचे असून पोलिसांनी तपास केल्यास बोराटे या शिक्षकाचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण पुढे येईल. - अशोक खर्चे, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारnewsबातम्या