शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 1:52 AM

शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत.

- प्रकाश गायकरपिंपरी  - शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत. अर्ज भरताना आपल्या स्वत:च्या घराचे स्थान दाखविण्यासाठी रहिवासी पुराव्यावरील पत्ता व शाळा आणि घराचे रेखांश, अक्षांश यांचाही विचार करावा लागतो. मात्र नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत.२५ टक्के मोफत प्रवेशाचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ५ मार्चला सुरुवात झाली. यासाठी पालकांना विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरताना विविध किचकट बाबींची पूर्तता करावी लागत आहे. पाल्ल्यांचे आरटीईचे अर्ज भरत असताना स्वत:चे घराचे स्थान रहिवासी पुराव्यावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करावे लागते. त्यासाठी गूगल नकाशावर घराचे लोकेशन ‘बलून’ राहत्या घरावरच दर्शवावा लागतो. जोपर्यंत आपल्या निवासस्थानावर बलूनचे चिन्ह येत नाही, तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही.सध्या अर्ज भरताना घराचेअचूक निशाण गूगल नकाशावर आढळून येत नाही. अर्ज भरतानाघराचे व शाळेचे अंतरही महत्त्वाचे समजले जाते. मात्र अक्षांस वरेखांश शोधण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घराचे निश्चित स्थान गूगलवर दिसत नाही. त्यामुळे अर्ज भरताना अडचणी येत आहेत.अ‍ॅपद्वारे १४३ अर्जजिल्ह्यातून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९६३ शाळा पात्र आहेत. तर १६ हजार ६१९ जागा भरण्यात येणार आहेत. ५ मार्चपासून आजपर्यंत ४१ हजार ७३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १४३ अर्ज मोबाइल अ‍ॅपद्वारे भरण्यात आले आहेत. तर ४१ हजार ५९२ अर्ज आॅनलाइन भरले आहेत.अर्जासाठी उरले तीन दिवसआरटीई प्रवेशासाठी पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता ५ मार्चपासून २२ मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांकडे अवघे तीन दिवस उरले आहेत. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करून या तीन दिवसांमध्ये अर्ज भरावा लागणार आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्र