शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा ‘रुट मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:51 IST

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई करून शुक्रवारी शहरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला.

पिंपरी : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोंबिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई करून शुक्रवारी शहरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला.सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांच्या समर्थनार्थ व विरोधात देशभर आंदोलन करण्यात येत आहेत. दिल्ली येथील या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात काही जणांचा बळी गेला. त्यामुळे या हिंसाचाराचे व्हिडीओ तसेच प्रक्षोभक ‘पोस्ट’ सोशल मीडियावरून व्हायरल व फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होऊ शकते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत.पिंपरी पोलिसांकडून गुुरवारी (दि. २७) कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली. परिमंडळ एकच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खराळवाडी, पिंपरी कॅम्प, भाटनगर, मिलिंद नगर, दापोडी आदी ठिकाणी पोलिसांचा ‘रुट मार्च’ झाला. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आदी रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते.भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑ परेशन तसेच प्रतिबंधात्मक कारवाई झाली. यात पोलिसांनी नऊ आरोपींवर कारवाई केली. तसेच कासारवाडी व दापोडी परिसरात ‘रुट मार्च’ काढण्यात आला. पोलीस बंदोबस्तात वाढसोशल मीडियावरून अफवा पसरविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड : अफवांवर विश्वास न ठेवता शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कायद्याचे पालन करावे. संशयास्पद काही आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा.

टॅग्स :Policeपोलिसdelhi violenceदिल्ली