शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत साडेसहा लाखाची चोरी; दहा तोळे दागिन्यांसह अडिच लाख लंपास, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:46 IST

चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली.

ठळक मुद्देकसलीही तोडफोड नाही, आवाज, गोंधळ नाही अशा वातावरणात घडला चोरीचा प्रकार एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीलाफिर्यादींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे निगडी पोलिसांनी केला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

निगडी : घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात घेवून चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. या प्रकरणी रविवारी फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित सुभाष डागा (वय २३, रा. डागा रेसिडेन्सी, निगडी प्राधिकरण) यांनी चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. ६ नोव्हेंबरला ही घटना घडली मात्र फिर्यादी काही कारणास्तव परदेश दौऱ्यावर गेले होते, त्यामुळे त्यांना फिर्याद दाखल करण्यास वेळ लागला. फिर्यादीचे बंधू मॉर्निंग वॉकला गेले होते. घरात महिला झोपली होती. आणखी एक जण दुसऱ्या खोलीत झोपले होते. चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधली. सहज घरात प्रवेश करून त्यांनी कपाटातील १० तोळे दागिने आणि अडिच लाखाची रोकड काही अल्पावधित लंपास केली. कोणालाही चोरी झाल्याचा सुगावा लागला नाही. घराचा दरवाजा उघडा असल्याने कसलीही तोडफोड नाही, आवाज, गोंधळ नाही अशा वातावरणात चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी मुद्देमाल घेवून कपाटाचा दरवाजा पुन्हा व्यवस्थित लावून तेथून पळ काढला. दागिने आणि रोकड असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे डागा कुटुंबीयांच्या लवकर लक्षात आले नाही. कामानिमित्त त्यांनी कपाट उघडले, त्यावेळी कपाटातील दागिने आणि रोकड गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे निगडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फिर्यादी काही कामानिमित्त परदेशात गेले होते, त्यामुळे फिर्याद दाखल होण्यास विलंब झाला, असे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Thiefचोरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड